"आज प्रेमाला हळदीचा रंग लागला…", विशाल-अक्षयाची लगीनघाई, लवकरच अडकणार विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:43 IST2026-02-10T16:42:27+5:302026-02-10T16:43:35+5:30
मराठी अभिनेत्याला हळद लागली! लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, हळदीचे फोटो समोर

"आज प्रेमाला हळदीचा रंग लागला…", विशाल-अक्षयाची लगीनघाई, लवकरच अडकणार विवाहबंधनात
Vishal Nikam And Akshaya Hindalkar Haldi Ceremony: सध्या मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. नुकतंच साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे यांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. आता मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आणखी एक लोकप्रिय जोडी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ही जोडी म्हणजे विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर. सध्या दोघांच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून नुकताच त्यांचा हळदीचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
नुकतेच सोशल मीडियावरविशाल निकमने त्याच्या हळदी सोहळ्याचे खास क्षण शेअर केले आहेत."आज प्रेमाला हळदीचा रंग लागला…", असं सुंदर कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे. हळदीसाठी विशाल आणि अक्षया हिंदळकरने खास लूक केला होता. विशालने व्हाईट कुर्ता पजामा असा पेहराव केला होता. तर त्याची होणारी पत्नी अक्षया जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे.
या फोटोंमध्ये विशाल आणि अक्षया हळदीच्या रंगात रंगल्याचं पाहायला मिळत आहे. हळदीआधी त्यांचा साखरपुडाही मोठ्या थाटामाटात ही पार पडला होता. आता लवकरच ही जोडीलग्नबंधनात अडकणार आहे. त्यांचे हे फोटो पाहून मराठी सेलिब्रिटींसह त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांनी स्टार प्रवाहच्या ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. आता ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेता विशाल निकमच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर'दख्खनचा राजा ज्योतिबा माझा' या मालिकेतून त्याला प्रसिद्धी मिळाली. सध्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. विशाल निकम बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वात सहभागी झाला होता.