"आनंददायी प्रवास संपला...", 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 14:07 IST2025-05-26T14:03:17+5:302025-05-26T14:07:18+5:30
छोट्या पडद्यावरील मालिका आणि प्रेक्षकांचं अतुट नातं असतं.

"आनंददायी प्रवास संपला...", 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाले...
Swapnil Rajeshekhar : छोट्या पडद्यावरील मालिका आणि प्रेक्षकांचं अतुट नातं असतं. या मालिकांमध्ये थोडाफार बदल झाला तरी प्रेक्षक नाराज होतात. टीआरपी अभावी काही मालिका बंद होतात. तर त्याजागी नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यात आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तुला शिकवीन चांगलाच लवकरच निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. या मालिकेमध्ये अभिनेता हृषिकेश शेलार, कविता मेढेकर, शिवानी रांगोळे आणि स्वप्नील राजशेखर हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केल्यानंतर ही मालिका आता निरोप घेणार आहे. याच मालिकेत चारुहासची भूमिका साकारणारे स्वप्नील राजशेखर (Swapnil Rajeshekhar) यांनी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत.
नुकतीच अभिनेते स्वप्नील राजशेखर आपल्या इन्स्टाग्रामवर एक मालिकेतील प्रवासाचा सुंदर व्हिडीओ शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय, "अलविदा “चारुहास सुर्यवंशी…”, दोन वर्ष, सातशेहुन जास्त एपिसोडस… उत्तम क्रिएटिव्ह टिम, चांगले सहकलाकार, छान प्रोडक्शन हाऊस, चांगली वाहिनी…आणि मी यापुर्वी न केलेली भुमिका, हतबल, आगतीक, भरडला जाणारा प्रेमळ बाप..., आणि त्याला प्रेक्षकांचं खुप प्रेम..एक आनंददायी प्रवास काल संपला… आता नव्या भुमिकेत लवकरच येईन." अशी पोस्ट लिहून त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या एका चाहत्याने या पोस्टवर कमेंट करत म्हटलंय , "वेगवेगळ्या छटा असलेली तुमची ही भूमिका उत्तम...", तर आणि आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय, "तुम्ही ग्रेट कलाकार आहात...".