मराठमोळा सुयश टिळक 'या' लोकप्रिय वेबसीरिजमध्ये झळकणार, अभिनेता म्हणाला- "मी स्वत:ला भाग्यवान..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 10:21 IST2024-11-14T10:16:26+5:302024-11-14T10:21:52+5:30
अॅमेझॉम प्राईमवरील या लोकप्रिय वेबसीरिजमध्ये सुयश टिळकची वर्णी; साकारणार महत्वाची भूमिका.

मराठमोळा सुयश टिळक 'या' लोकप्रिय वेबसीरिजमध्ये झळकणार, अभिनेता म्हणाला- "मी स्वत:ला भाग्यवान..."
Suyash Tilak: बहुचर्चित अॅमेझॉन प्राईमवरील वेबसीरिज 'बंदिश बॅंडिट्स' (Bandish Bandits) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या सीरिजच्या पहिल्या भागात कलाकारांच्या अभिनयाची, लेखन आणि दिग्दर्शनासह संगीताची प्रशंसा झाली होती. शिवाय संगीत हे या वेबसीरिजचं प्रमुख वैशिष्ट्य होतं. 'बंदिश बॅंडिट्स'च्या पहिल्या भागात नसिरुद्दिन शहा, ऋत्विक भौमिक, अतुल कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली होती. अशातच या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागात एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे.
'बंदिश बँडिट्स' या वेबसिरिजचा दुसऱ्या सीझनमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) झळकणार आहे. या सीरिजमध्ये सुयश एका महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
नुकतीच सुयश टिळकनेसोशल मीडियावर 'बंदिश बँडिट्स'ची पोस्टर इमेज शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहलंय, "'बंदिश बँडिट्स'चा एक छोटासा भाग असल्याबद्दल मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. बऱ्याच दिवसापासून मी या नवीन प्रोजेक्टची घोषणा करण्याची वाट पाहत होतो. त्यामुळे मला तुमच्या सदिच्छांची गरज आहे". पुढे सुयशने म्हटलंय, "तुमच्या आवडत्या 'बंदिश बँडिट्स'चा दुसरा सीझन लवकरच भेटीला येतोय". येत्या १३ डिसेंबरला या वेब सीरिजचा नवा सीझन प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आनंद तिवारी हे या सीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत.
सुयश टिळकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, 'का रे दुरावा' या मालिकेतून अभिनेता सुयश टिळक घराघरात पोहोचला. शिवाय त्याने 'बापमाणूस', 'पुढचं पाऊल', 'दुर्वा', 'जाऊ नको दूर बाबा', 'सख्या रे' या मालिकांमध्ये काम केलं आहे. उत्तम अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. सुयशने मालिकांबरोबरच सिनेमातही काम केलं आहे. विविधांगी भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.