"लग्न झालंय मस्त आता.."; शाल्व किंजवडेकरने बायकोसाठी घेतला धमाल उखाणा; गृहप्रवेशाचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 09:31 IST2024-12-27T09:31:30+5:302024-12-27T09:31:47+5:30
शाल्व किंजवडेकर आणि त्याच्या पत्नीचा गृहप्रवेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा (shalva kinjawadekar)

"लग्न झालंय मस्त आता.."; शाल्व किंजवडेकरने बायकोसाठी घेतला धमाल उखाणा; गृहप्रवेशाचा व्हिडीओ व्हायरल
'येऊ कशी तशी मी नांदायला' फेम अभिनेता शाल्व किंजवडेकर काहीच दिवसांपूर्वी त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफळापूरकरसोबत लग्नबंधनात अडकला. शाल्व-श्रेयाच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार उपस्थित होते. शाल्व-श्रेयाने पारंपरिक अंदाजात कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. शाल्व-श्रेयाचा लग्नानंतरचा गृहप्रवेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आलाय. या व्हिडीओत शाल्व-श्रेयाचं घरी जंगी स्वागत झालं असून दोघांनी एकमेकांसाठी खास उखाणा घेतलाय.
शाल्व-श्रेयाचा झक्कास उखाणा
लग्नानंतर अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि त्याची बायको श्रेया डफळापूरकर यांच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत शाल्व आणि श्रेयाने एकमेकांसाठी उखाणा घेतलाय. सुरुवातीला श्रेया उखाणा घेते की, "मंगळसूत्राच्या दोन वाट्या, सौभाग्याची खूण, शाल्वचं नाव घेते किंजवडेकरांची सून." नंतर शाल्व श्रेयासाठी उखाणा घेतो की, "लग्न झालंय मस्त, ओलांडणार आहे आता माप, आता बायको म्हणून तुम्हाला हवं तेवढं काम." दोघांचा उखाणा झाल्यावर तिथे उपस्थित असलेले सिद्धार्थ चांदेकर आणि इतर कलाकार मंडळी दाद देताना दिसतात.
शाल्व-श्रेयाने थाटामाटात केलं लग्न
गेल्या काही वर्षांपासून शाल्व किंजवडेकर आणि श्रेया डफळापूरकर रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा या दोघांचे एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. दरम्यान, सध्या शाल्व झी मराठीवरील 'शिवा' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तर श्रेया डफळापूरकर कॉश्च्युम डिझायनर आहे. 'स्टाईल बाय श्रेया' हा तिचा कपड्यांचा ब्रँड आहे. तिने अनेक सेलिब्रिटींसाठी कॉश्च्युन डिझाईन केला आहे. या दोघांच्या लग्नाला इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणी उपस्थित होतेे.