संकर्षण कऱ्हाडेचं मूळ गाव कोणतं? अभिनेता फोटो दाखवत म्हणाला- "लहानपणापासून आम्हाला.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:35 IST2025-07-17T15:35:02+5:302025-07-17T15:35:49+5:30
संकर्षण कऱ्हाडे प्रथमच त्याच्या मूळ गावाबद्दल सर्वांना खास गोष्ट सांगितली आहे. काय म्हणाला संकर्षण?

संकर्षण कऱ्हाडेचं मूळ गाव कोणतं? अभिनेता फोटो दाखवत म्हणाला- "लहानपणापासून आम्हाला.."
संकर्षण कऱ्हाडे हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संकर्षणला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय. संकर्षण परभणीचा आहे हे आपल्या सर्वांना माहितीये. पण संकर्षणचं मूळ गाव कोणतं, याचा खुलासा त्याने पहिल्यांदाच सर्वांसमोर केला आहे. संकर्षणने गावातील मंदिरांचे फोटो शेअर करत खास किस्से सर्वांना सांगितले आहेत. काय म्हणाला संकर्षण? जाणून घ्या
संकर्षण कऱ्हाडे लिहितो की, "आमच्या मूळ गावी … “अंबाजोगाई” ला जाउन देवीचं आणि कऱ्हाडेंच्या घरच्या मारूती रायाचं दर्शन घेतलं … फोटो क्रमांक २ मधल्या गणपतीची गंमत सांगतो… लहानपणापासून आम्हाला सांगण्यात आलं होतं कि , देवीच्या मंदीरातल्या गणपती बाप्पाला तुम्ही दाबून चिकटवलेला तांदूळ/गहू जर चिकटला तर तुम्ही परिक्षेत पास होता… मी दात ओठ खाऊन चिकटवलेला गहू नेsssहमि २ सेकंद चिकटायचा आणि आपोआप गळून पडायचा…"
"थोडक्यात मी पास होणारे का नापास हा सस्पेन्स गणपती बाप्पा राखून ठेवायचा… आज बऱ्याच दिवसांनी वाटलं गहू चिकटवावा… तर गणपती बाप्पा कुलूपाआड होते… माझ्या मनांत विचार आला … गणपतीनेच सांगीतलं असेल… नापास होणारी सगळी पोरं मला दाबू दाबू गहू चिकटवतायेत त्यापेक्षा मला लाॅक करा… असो … पण बाप्पा म्हणल्यावर काहीतरी मागावसं वाटतंच कि हो… ते मागीतलं आणि अपेक्षांचा एक गहू चिकटवून मी अंबाजोगाईहून निघालो…", अशाप्रकारे संकर्षणने खास किस्सा सर्वांना सांगितलाय