अमृताला मिळणार गुढीपाडव्याचं खास सरप्राइज; प्रसादने सांगितला त्याचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 14:35 IST2024-04-08T14:35:00+5:302024-04-08T14:35:00+5:30
Prasad jawade: प्रसाद आणि अमृता लग्नानंतर त्यांचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार आहेत.

अमृताला मिळणार गुढीपाडव्याचं खास सरप्राइज; प्रसादने सांगितला त्याचा प्लॅन
सध्या मराठी कलाविश्वात 'पारु' ही मालिका चांगलीच गाजत आहे. या मालिकेत अभिनेता प्रसाद जवादे (prasad jawade) महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. लग्नानंतर प्रसादची ही पहिली मालिका आहे. त्यामुळे यंदाचं वर्ष त्याच्यासाठी विविध कारणांमुळे खास आहे. प्रसाद यंदा त्याचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार असून त्याने त्याचा सेलिब्रेशनचा प्लॅन सांगितला आहे.
पारु या मालिकेमुळे चर्चेत येत असलेल्या प्रसादने अभिनेत्री अमृता देशमुख (amruta deshmukh) हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. काही महिन्यांपूर्वीच या जोडीचं लग्न झालं असून ते लग्नानंतर त्यांचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार आहेत. विशेष म्हणजे या पाडव्याच्या निमित्ताने तो अमृताला खास सरप्राइज देणार आहे.
"यावेळीचा गुढीपाडवा बायकोसोबत साजरा करायचा प्रयत्न आहे. पण, जर सुट्टी मिळाली नाही तर व्हिडीओ कॉलवर एकत्र गुढी उभारु. पण, सुट्टी मिळवण्यासाठीच प्रयत्न सुरु आहे. हल्लीच आम्ही ठाण्याला शिफ्ट झालो. त्यामुळे इथेच पाडवा साजरा करायचा विचार आहे", असं प्रसाद म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "अमृताला मी एक छान साडी गिफ्ट करणार आहे. खास साताऱ्यातून ही साडी घेऊन तिला सरप्राइज देणार आहे. तसंच जर या दिवशी सुट्टी मिळाली तर तर आम्ही एकत्र मिळून स्वयंपाक करु. यात वरण, भात,भाजी,पोळी हे पदार्थ मी करणार आहे."
दरम्यान, "पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी मी तिला एका खास जागी घेऊन जाणार आहे. तिला सूर्यास्त पाहायला खूप आवडतो. आम्ही डेट करायला लागल्यापासून ज्या ठिकाणी भेटायचो त्याच जागी मी पुन्हा तिला घेऊन जाणार आहे."