देवदर्शनासाठी निघाली अंजलीबाई अन् राणादाची जोडी; अक्कलकोट स्वामींच्या चरणी झाले लीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 16:04 IST2024-06-25T16:04:33+5:302024-06-25T16:04:54+5:30
Akshaya deodhar: सध्या अक्षया आणि हार्दिक देवदर्शनासाठी निघाले आहेत. नुकतंच त्यांनी अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं.

देवदर्शनासाठी निघाली अंजलीबाई अन् राणादाची जोडी; अक्कलकोट स्वामींच्या चरणी झाले लीन
'तुझ्यात जीव रंगला' या गाजलेल्या मालिकेतून इंडस्ट्रीला मिळालेली जोडी म्हणजे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी. या मालिकेत अंजली पाठक आणि राणादा ही भूमिका साकारुन ही जोडी प्रचंड लोकप्रिय झाली. सोशल मीडियावर अक्षया आणि हार्दिक प्रचंड सक्रीय आहेत त्यामुळे वरचेवर त्यांची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होते. सध्या ही जोडी देवदर्शनासाठी गेले आहेत.
रील लाइफ पार्टनर असलेले हे कलाकार आता रिअल लाइफ जोडीदार झाले आहेत. त्यामुळे आता बऱ्याचदा ते त्यांच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत येतात. सध्या अक्षया आणि हार्दिक देवदर्शनासाठी निघाले आहेत. नुकतंच त्यांनी अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं.
अक्षयाने इन्स्टाग्रामवर अक्कलकोटमधील स्वामींच्या मठातला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. लग्नानंतर अक्षयाचा कलाविश्वातील वावर पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती सक्रीय आहे. तर, अलिकडेच हार्दिक जाऊबाई गावात या कार्यक्रमात दिसला होता.