'तो' परत आला! १२ वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचं टीव्हीवर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 14:10 IST2026-04-03T14:06:31+5:302026-04-03T14:10:07+5:30

तब्बल १२ वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेता टीव्हीवर परतला, प्रोमो पाहून प्रेक्षकांनी अचूक हेरलं, कोण आहे तो?

marathi actor chinmay mandlekar comeback in television after 12 years play important role in sanai choughade serial | 'तो' परत आला! १२ वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचं टीव्हीवर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार भूमिका 

'तो' परत आला! १२ वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचं टीव्हीवर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार भूमिका 

Sanai Chaughade Serial : अलिकडच्या काळात छोट्या पडद्यावर नवीनवीन विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतीच झी मराठी वाहिनीवर सनई चौघडे ही कौटुंबिक मालिका सुरु करण्यात आली आहे.  कौटुंबिक विषय आणि तगड्या कलाकारांची फळी असलेली ही मालिका अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. 'सनई चौघडे' मालिकेत अभिनेता राज हंचनाळे मुख्य नायकाच्या भूमिकेत आहे. अशातच या मालिकेच्या माध्यमातून एक लोकप्रिय चेहरा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून चिन्मय मांडलेकर आहे.


प्रसिध्द अभिनेता चिन्मय मांडलेकर तब्बल १२ वर्षांनी टीव्हीवर कमबॅक करत आहे. जवळपास १२ वर्षांपूर्वी चिन्मची मुख्य भूमिका असलेली तू तिथे मी ही मालिका झी मराठीवर प्रसारित व्हायची. या मालिकेत त्याने साकारलेली सत्यजीतची भूमिका अजूनही प्रेक्षक विसरलेले नाहीत. आता बऱ्याच कालावधीनंतर अभिनेत्याने मालिकाविश्वात पुनरागमन केलं आहे.  चिन्मय आता 'सनई चौघडे' या मालिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत देखील त्याच्या भूमिकेचे नाव सत्यजित असेच आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हा प्रोमो वाहिनीने शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्याची पाठमोरी झलक पाहायला मिळतेय.  अभिनेत्याचा प्रोमोमधील लूक पाहून प्रेक्षक प्रचंड उत्सुक झाले आहेत.

दरम्यान, 'सनई चौघडे' मालिकेत अभिनेत्री मेघना एरंडे सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मालिकेत ती चार मुलींची आई दाखवण्यात आली आहे. आपल्या चार मुलींना चांगली स्थळं मिळावीत आणि त्यांच्या सुखीसंसाराची स्वप्न पाहणारी आई सतत जावयाच्या शोधात असते. आता तिला तिच्या मनासारखा जावई मिळतो की नाही ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Web Title : चिन्मय मांडलेकर 12 साल बाद 'सनई चौघडे' से टीवी पर वापसी

Web Summary : अभिनेता चिन्मय मांडलेकर 12 साल बाद ज़ी मराठी के सीरियल 'सनई चौघडे' से टेलीविजन पर वापसी कर रहे हैं। वह 'तू तिथे मी' में अपनी भूमिका की याद दिलाते हुए सत्यजीत नामक एक किरदार निभाएंगे। मेघना एरंडे भी अपनी बेटियों के लिए उपयुक्त वर की तलाश में एक माँ के रूप में अभिनय कर रही हैं।

Web Title : Chinmay Mandlekar Returns to TV After 12 Years in 'Sanai Chaughade'

Web Summary : Actor Chinmay Mandlekar is making a comeback to television after 12 years with the series 'Sanai Chaughade' on Zee Marathi. He will be playing a character named Satyajit, reminiscent of his role in 'Tu Tithe Mee'. Meghna Erande also stars as a mother searching for suitable matches for her daughters.