अविनाश नारकरांचा नवा स्वॅग; 'बहरला हा मधुमास'वर केला भन्नाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 18:24 IST2023-03-16T18:21:33+5:302023-03-16T18:24:51+5:30
Avinash narkar: अविनाश नारकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील 'बहरला हा मधुमास' नवा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

अविनाश नारकरांचा नवा स्वॅग; 'बहरला हा मधुमास'वर केला भन्नाट डान्स
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता अविनाश नारकर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहेत. एकीकडे त्यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत येत असतानाच अविनाश नारकर त्यांच्या हटके डान्स स्टाइलसाठी चर्चेत येत आहे.
अविनाश नारकर सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असून बऱ्याचदा ते काही फनी व्हिडीओ वा फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात काही वेळा त्यांच्या को अॅक्टर्ससोबतचे डान्स व्हिडीओदेखील असतात. यावेळी देखील त्यांनी त्यांचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
अविनाश नारकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातील 'बहरला हा मधुमास' नवा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हे गाणं श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी गायलं असून सध्या सोशल मीडियावर हे गाणं तुफान लोकप्रिय ठरत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या गाण्यावर रिल्स केले आहेत. यात अविनाश नारकरही अपवाद नाहीत. या गाण्यावर त्यांनीही ताल धरला.
दरम्यान, मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून अविनाश नारकर (avinash narkar) यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अविनाश सध्या '३६ गुणी जोडी' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.