अखेर इंद्रा संपूर्ण शहरासमोर करणार दिपूला प्रपोज; काय असेल तिचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 17:55 IST2022-01-21T17:54:49+5:302022-01-21T17:55:28+5:30
Mann udu udu zal: इंद्रा सगळा विरोध झुगारुन जाहीरपणे दिपूला प्रपोज करणार आहे.

अखेर इंद्रा संपूर्ण शहरासमोर करणार दिपूला प्रपोज; काय असेल तिचं उत्तर
छोट्या पडद्यावरील 'मन उडू उडू झालं' (man udu udu zhal) ही मालिका सध्या रंजक वळणावर असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे इंद्राने दिपूसमोर त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. तर, दुसरीकडे देशपांडे सरांनी सानूसोबत त्याने लग्न करावं अशी विनंती केली आहे. त्यामुळे सध्या या मालिकेत अनेक वळण येत असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, या मालिकेत आता पुन्हा एक नवा ट्विस्ट येणार आहे. इंद्रा सगळा विरोध झुगारुन जाहीरपणे दिपूला प्रपोज करणार आहे.
सध्या सोशल मीडियावर इंद्रा आणि दिपूचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये इंद्रा एका हॉट एअरमध्ये बसून दिपूला लग्नाची मागणी घालतांना दिसत आहे. विशेष म्हणजे हा फोटो पाहिल्यानंतर इंद्रा आता सानिकाशी लग्न करण्यास नकार देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या मालिकेतील नवा ट्विटस्ट पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
दरम्यान, जवळपास १५० फूट उंचीवर हा सीन शूट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत कुठल्याच मालिकेत इतका ग्रँड सीन शूट झालेला नाही. परंतु, इंद्राने जरी ग्रँड पद्धतीने दिपूला प्रपोज केलं असलं तरीदेखील दिपू त्याला होकार देईल का? दिपू इंद्राच्या प्रेमाचा स्वीकार करून त्याची साथ देईल का? याची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.