'शो जिंकल्यानंतरही मिळालं नाही प्राइज मनी'; मनिषा राणीने केली 'झलक दिखला जा'ची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 11:28 AM2024-04-13T11:28:57+5:302024-04-13T11:29:26+5:30

Manisha rani: मनिषाला ३० लाख रुपये प्राइज मनी मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. परंतु, यापैकी एकही रुपया अद्यापही तिच्या खात्यात जमा झालेला नाही.

manisha-rani-not-received-winning-prize-from-jhalak-dikhhla-jaa-11 | 'शो जिंकल्यानंतरही मिळालं नाही प्राइज मनी'; मनिषा राणीने केली 'झलक दिखला जा'ची पोलखोल

'शो जिंकल्यानंतरही मिळालं नाही प्राइज मनी'; मनिषा राणीने केली 'झलक दिखला जा'ची पोलखोल

'दिलों की रानी' या नावाने खासकरुन चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे मनिषा राणी. 'बिग बॉस ओटीटी', 'झलक दिखला जा 11' यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये झळकून मनिषाने तुफान लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे आपल्या उत्तम नृत्य कौशल्याच्या जोरावर तिने 'झलक दिखला जा 11' चं जेतेपदही पटकावलं, परंतु, या शो विषयी आता तिने मोठा गौप्यस्फोट केला आहे. हा शो जिंकल्यानंतरही विजयाची रक्कम अद्यापही आपल्याला देण्यात आलेली नाही असा खुलासा तिने केला आहे.

मनिषाने नुकत्याच तिच्या व्लॉगमध्ये काही गोष्टींचा खुलासा केला. यावेळी ती तिचा मित्र महेश केशवाला याच्यासोबत चर्चा करत होती. या चर्चेमध्येच तिने 'झलक दिखला जा' चं11 वं पर्व जिंकल्यानंतरही प्राइज मनी अद्यापही न दिल्याचं म्हटलं आहे. तिच्या या खुलाशानंतर सगळेच जण थक्क झाले आहेत.

नेमकं काय म्हणाली मनीषा राणी?

'झलक दिखला जा' जिंकल्यानंतर जी प्राइज मनी मिळते ती मला अद्यापही मिळालेली नाही. तसंही जी रक्कम आहे त्यातील अर्धी रक्कम तर ते लोक कापूनच घेतात, असं मनीषा म्हणाली.

दरम्यान, या व्लॉगमध्ये तिने या शोविषयी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. मनिषा राणी 'झलक दिखला जा'च्या 11 व्या पर्वाची विजेती ठरली आहे. त्यामुळे तिला ३० लाख रुपये प्राइज मनी मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. परंतु, यापैकी एकही रुपया अद्यापही तिच्या खात्यात जमा झालेला नाही. या सोमध्ये फराह खान, मलायका अरोरा आणि अर्शद वारसी हे परीक्षकाची भूमिका साकारत आहेत.

Web Title: manisha-rani-not-received-winning-prize-from-jhalak-dikhhla-jaa-11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.