Man Udu Udu Zhala : गृहप्रवेशावेळी दीपूचा इंद्राजींसाठी खास उखाणा, तुम्ही ऐकलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 13:29 IST2022-07-24T13:28:19+5:302022-07-24T13:29:01+5:30
Man Udu Udu Zhala : सर्वानांच इंद्रा आणि दीपूच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता होती. या दोघांना नवरा-नवरीच्या रुपात पाहण्यासाठी चाहते आतुर होते. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे...

Man Udu Udu Zhala : गृहप्रवेशावेळी दीपूचा इंद्राजींसाठी खास उखाणा, तुम्ही ऐकलात का?
प्रेक्षकांची आवडती मालिका ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Zhala ) आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. अनेक संकटांवर मात करून इंद्रा आणि दीपूच्या प्रेमाचा विजय झाला. इंद्राने चॅलेंज पूर्ण करत, पुन्हा एकदा देशपांडे सर आणि संपूर्ण घरातील मंडळींच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. देशपांडे सरांनी इंद्रा व दीपूचं नातं स्वीकारल्यानं आता इंद्रा व दीपूचं लग्न होतंय. आज इंद्रा व दीपूचा शाही लग्नसोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता इंद्रा व दीपूचा लग्नसोहळ्याचा खास १ तासाचा विशेष भाग प्रसारित होणार आहे. त्याआधी या लग्नसोहळ्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
अशी नटली नवरी, सजला नवरा
इंद्रजीत व दीपिकाच्या लग्नसोहळ्याचा थाट काही न्याराच. लग्नासाठी इंद्रा व दीपू असे सजले नटले. लग्नमंडपात दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या. दोघांच्या लग्नाची खास झलक या व्हिडीओत पाहायला मिळतेय. हातात हिरवा चुडा, डोक्याला बाश्ािंग असा दीपूचा थाट... दोघांची बाईकवरून झालेली डॅशिंग एन्ट्री, लग्नमंडपाची धम्माल मस्तीमज्जा, दीपू व इंद्राचं एकमेकांच्या डोळ्यांत हरवणं... सगळं या व्हिडीओत आहे.
दीपूनं घेतला अस्सल उखाणा...
दीपूचा गृहप्रवेशही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यावेळी दीपू इंद्रासाठी खास उखाणा घेते, त्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ‘वाटेला कुणी गेलं नाही, इंद्राजींची सोबत होती म्हणून. देशपांडेची दीपू झालीये आता साळगावकरांची मोठी सून...,’असं म्हणत दीपू सानिकाला अप्रत्यक्षपणे उत्तर देते.
झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. इंद्रा आणि दिपूचा गोड शेवट शूट करुन मालिकेचाही गोड शेवट करत ही मालिका संपणार आहे. त्यामुळे सध्या मालिका मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.