रिना मधुकरच्या अंडरवॉटर फोटोशूटचा BTS व्हिडीओ आला समोर; video पाहून तुम्हीही म्हणाल 'व्वा!'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 05:46 PM2022-03-10T17:46:55+5:302022-03-10T17:47:20+5:30

Reena madhukar: आजवर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी अंडरवॉटर फोटोशूट केलं आहे. मात्र, मराठी कलाविश्वात पहिल्यांदाच रिनाने हा प्रयोग केला आणि तो यशस्वीदेखील झाला.

man udu udu zhala fame sanu aka reena madhukar share underwater photoshoot bts video | रिना मधुकरच्या अंडरवॉटर फोटोशूटचा BTS व्हिडीओ आला समोर; video पाहून तुम्हीही म्हणाल 'व्वा!'

रिना मधुकरच्या अंडरवॉटर फोटोशूटचा BTS व्हिडीओ आला समोर; video पाहून तुम्हीही म्हणाल 'व्वा!'

googlenewsNext

छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे मन उडू उडू झालं. या मालिकेतील प्रत्येक कलाकार सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असतात. त्यातलंच एक नाव म्हणजे रिना मधुकर. या मालिकेत ती सानिका ही भूमिका साकारत आहे. थोडीशी हट्टी, आगाऊ अशी तिची भूमिका असून ती लोकप्रिय होत आहे. काही दिवसांपूर्वीच रिनाने अंडरवॉटर फोटोशूट केलं होतं.

आजवर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी अंडरवॉटर फोटोशूट केलं आहे. मात्र, मराठी कलाविश्वात पहिल्यांदाच रिनाने हा प्रयोग केला आणि तो यशस्वीदेखील झाला. विशेष म्हणजे हे फोटोशूट कशा पद्धतीने केलं जातं हे तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. सोबतच तिच्या टीमचे आभारही मानले आहेत. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रिमा मधुकरने अंडरवॉटर फोटोशूट केलं होतं. याचे काही फोटोदेखील तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.  रिना मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तसंच तिने अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.
 

Web Title: man udu udu zhala fame sanu aka reena madhukar share underwater photoshoot bts video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.