पोटात लाथा मारल्या, चेहऱ्यावर ठोसे...; लोकप्रिय अभिनेत्रीचे एक्स बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप, म्हणाली- "त्याने मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 11:29 IST2025-09-05T11:25:42+5:302025-09-05T11:29:55+5:30
लोकप्रिय अभिनेत्रीचे एक्स बॉयफ्रेंडवर मारहाणीचे आरोप, पोस्ट शेअर करत केला खुलासा

पोटात लाथा मारल्या, चेहऱ्यावर ठोसे...; लोकप्रिय अभिनेत्रीचे एक्स बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप, म्हणाली- "त्याने मला..."
Malyalam Tv Actress : प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री जसेला परवीन सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. अलिकडेच अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत. जसेलाने तिच्या प्रियकरावर शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. अभिनेत्रीला तिच्या बॉयफ्रेंडने मारहाण केली असल्याचं तिने म्हटलं आहे, ज्यात तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत या सगळ्या प्रकरणावर भाष्य करत मौन सोडलं आहे. जसलीनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे चेहऱ्यावरच्या जखमा दाखवत काही फोटो शेअर केले आहेत. ३१ डिसेंबरच्या न्यू ईअर पार्टीत काय घडलेलं त्यासकट सगळ्या गोष्टींचे खुलासे केले आहेत. यादरम्यान तिने म्हटलंय, "न्यू ईअर पार्टीमध्ये आमच्यात वाद झाले होते. त्यानंतर त्याने माझ्या पोटात लाथा मारल्या, चेहऱ्यावर ठोसे मारले. त्याने हातात कडा घातला होता त्यामुळे माझ्या चेहऱ्याला दुखापत झाल्याने प्लास्टिक सर्जरी करण्याची वेळ आली आहे. "
पुढे तिने म्हटलंय की, "सुरुवातीला तो मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास नकार देत होता. पण नंतर मी माझ्या प्रकृतीबद्दल खोटं सांगून त्याचं मत बदललं, तेव्हा तो मला तिथे घेऊन जाण्यास तयार झाला. तिथे गेल्यानंतरही तो खोटंच बोलत होता. काही दिवसांनी मी तक्रार दाखल केली. या प्रकरणी कोर्टात खटला अजूनही सुरू आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या या पोस्टमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. "
डिप्रेशनमुळे १० किलो वजन कमी झालं...
या पोस्टमध्ये अभिनेत्रीने तिच्या मेन्टल हेल्थवरही भाष्य केलं. या पोस्टद्वारे डिप्रेशनमुळे १० किलो वजन कमी झालं असंही तिने सांगितलंय. त्याबद्दल सविस्तर सांगताना तिने म्हटलं, "सर्जरीनं माझ्या चेहऱ्यावरच्या जखमांना टाके लागले. पण माझं तोंड कोणीही बंद करु शकत नाही. त्याला माझ्या आयुष्यात परत यायचं होतं. मी त्याला शेवटची संधी दिली. मी त्याला फक्त एक माफीपत्र लिहायला सांगितलं, आणि हे प्रकरण संपवण्याचं ठरवलं. मात्र, त्याने कोर्टाचा दरवाजा ठोठावला." असा धक्कादायक खुलासा अभिनेत्रीने केला आहे.