मालती करणार दिपू-इंद्राला मदत; पुन्हा एकदा देशपांडे सरांपासून लपवलं जाणार सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 10:53 IST2022-04-18T10:52:51+5:302022-04-18T10:53:21+5:30
Man udu udu zala: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये इंद्रा-दिपूचं सत्य मालती देशपांडे सरांपासून लपवून ठेवायचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं.

मालती करणार दिपू-इंद्राला मदत; पुन्हा एकदा देशपांडे सरांपासून लपवलं जाणार सत्य
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. 'फुलपाखरु','दुर्वा' या गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली हृता सध्या मन उडू उडू झालं या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यामुळे हृता कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते. त्यामुळे 'मन उडू उडू झालं' या मालिकेतील तिच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. विशेष म्हणजे आता या मालिकेत एक रंजकदार वळण आलं आहे. इंद्रा आणि दिपूचं प्रेम प्रकरण मालतीसमोर आलं आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये इंद्रा-दिपूचं सत्य मालती देशपांडे सरांपासून लपवून ठेवायचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, हे सत्य देशपांडे सरांसमोर आल्यानंतर या मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
दिपू आणि इंद्राचं एकमेकांवर प्रेम आहे हे मालतीला कळून चुकलं आहे. त्यातच साळगांवकरांच्या घरी गेल्यानंतर दिपू एकदम आनंदात असते हे देशपांडे सरांना कळलं आहे. मात्र, ती साळगांवकरांकडे गेल्यावर इतकी खूश का असते असा प्रश्न देशपांडे सर मालतीला विचारतात. मात्र, मालती, दिपूचं इंद्रावर प्रेम असल्याचं सत्य लपवते.
दरम्यान, देशपांडे सर नुकतेच मोठ्या आजारातून बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना हे सत्य समजल्यानंतर त्यांच्या आरोग्यावर पुन्हा विपरित परिणाम होईल या भीतीने मालती सत्य लपवण्याचा प्रयत्न करते. मात्र, देशपांडे सरांसमोर सत्य आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे.