७२ व्या वर्षीही तोच उत्साह! महेश कोठारेंचा अनेक वर्षांनी 'चिकी चिकी बुबूम बूम' गाण्यावर डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 11:47 IST2026-05-08T11:46:35+5:302026-05-08T11:47:51+5:30

'सावळ्याची जणू सावली' मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाल्याने खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

mahesh kothare dances on chiki chiki booboom boom song at celebration party of serial savalyachi janu savali | ७२ व्या वर्षीही तोच उत्साह! महेश कोठारेंचा अनेक वर्षांनी 'चिकी चिकी बुबूम बूम' गाण्यावर डान्स

७२ व्या वर्षीही तोच उत्साह! महेश कोठारेंचा अनेक वर्षांनी 'चिकी चिकी बुबूम बूम' गाण्यावर डान्स

मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि एव्हरग्रीन व्यक्तिमत्व महेश कोठारे. त्यांनी आजवर मराठी सिनेसृष्टीला अनेक हिट सिनेमे दिले. विशेषत: लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्यासोबतचे त्यांनी अनेक सिनेमे केले. त्यांच्या प्रत्येक सिनेमात लक्ष्या तर असायचाच. त्यांच्या मैत्रीची खूप चर्चा व्हायची. महेश कोठारे यांचं कोठारे व्हिजन हे प्रोडक्शन हाऊस आहे. याअंतर्गत सध्या गाजत असलेली मालिका 'सावळ्याची जणू सावली'ने नुकताच ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्त आयोजित पार्टीमध्ये महेश कोठारेंनी 'चिकी चिकी बुबूम बूम' या त्यांच्या जुन्या गाण्यावर ठेका धरला.

'सावळ्याची जणू सावली' मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाल्याने खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मालिकेतील कलाकार, क्रू आणि निर्माते यावेळी एकत्र आले. सर्वांनी मजा मस्ती केली, डान्स केला. निर्माते महेश कोठारेंनी या पार्टीतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सर्वांनी केक कापत, डान्स करत हे अचिव्हमेंट साजरं केलं आहे.


तर आणखी एका व्हिडीओत महेश कोठारे 'चिकी चिकी बुबूम बूम' या सुपरहिट गाण्यावर नाचताना दिसत आहेत. त्यांचा जोश पाहून इतरही कलाकार त्यांना जॉइन करत आहेत. हे गाणं महेश कोठारेंच्याच 'थरथराट' सिनेमातलं आहे.


महेश कोठारे ७२ वर्षांचे आहेत. याही वयात त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा आहे. महेश कोठारेंनी ९० च्या काळात 'झपाटलेला,'धडाकेबाज','थरथराट','धूम धडाका','माझा छकुला,'पछाडलेला','दे दनादन','खबरदार','जबरदस्त' असे अनेक सिनेमे दिले आहेत. 

Web Title : 72 साल की उम्र में भी वही उत्साह! महेश कोठारे का डांस

Web Summary : निर्देशक महेश कोठारे ने 72 साल की उम्र में अपनी पुरानी हिट फिल्म 'चिकी चिकी बूम बूम' गाने पर उत्साहपूर्वक नृत्य किया। यह नृत्य 'सावळ्याची जणू सावली' के 500 एपिसोड पूरे होने की खुशी में आयोजित पार्टी में किया गया। यह गाना उनकी फिल्म 'थरथराट' का है।

Web Title : Mahesh Kothare dances to 'Chiki Chiki Boom Boom' at 72!

Web Summary : Director Mahesh Kothare, at 72, danced with enthusiasm to his old hit song 'Chiki Chiki Boom Boom' at the 500-episode celebration party of the series 'Savalayachi Janu Savali.' The song is from his film 'Thartharat'.