Vanita Kharat wedding : वनीची मेहंदी...! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातच्या हातावर सजली मेहंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 11:17 IST2023-01-31T11:16:29+5:302023-01-31T11:17:33+5:30

Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat wedding : येत्या २ फेब्रुवारीला वनिता खरात बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाचे विधी सुरू झाले आहेत...

Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat wedding mehndi pics viral | Vanita Kharat wedding : वनीची मेहंदी...! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातच्या हातावर सजली मेहंदी

Vanita Kharat wedding : वनीची मेहंदी...! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातच्या हातावर सजली मेहंदी

'महाराष्ट्राच्या हास्यजत्रा' या शोमधील तुमची आमची लाडकी वनी अर्थात वनिता खरात (Vanita Kharat) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. होय, येत्या २ फेब्रुवारीला वनिता खरात बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत (Sumit Londhe) लग्नगाठ (Vanita Kharat Sumit Londhe Wedding) बांधणार आहे. तर या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. वनिताच्या हातावर सुमितच्या नावाची मेहंदीही सजली आहे. 
 नुकताच वनिताचा मेहेंदी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वनिताच्या मेहंदी सोहळ्यात हास्यजत्रेतील अनेक कलाकार हजर होते.  शिवाली परब, चेतना भट्ट यांनी वनिताच्या मेहेंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वनिताचा होणारा नवरा सुमित लोंढे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे. त्याला फिरण्याची आवड आहे. वनिताने सुमितसोबतचे अनेक फोटोदेखील शेअर केले आहेत. दोघांचेही फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.   
वनिता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमासह 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' (Post Office Ughad Aahe) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या वनिताने चित्रपटांमध्येही काम केलं आहे. कबीर सिंग या शाहिद कपूरच्या सिनेमात तुम्ही तिला बघितलं असेलच. मोलकरणीच्या हातामधून ग्लास खाली पडून फुटतो आणि सनकी शाहिद तिच्यामागे रागाने धावत सुटतो,असा एक सीन या सिनेमात होता. या सीनमधील ती मोलकरीण कोण होती? तर ती वनिता खरात होती. कबीर सिंग या सिनेमात तिने शाहिदच्या मोलकरणीची भूमिका साकारली होती. आधी या सीनमधील ती मोलकरीण अर्पिता खान (सलमान खानची बहिण) आहे, असा अनेकांचा समज झाला होता. पण ती अर्पिता नसून वनिता खरात होती.  ‘सरला एक कोटी’ चित्रपटातही ती झळकली होती. 

Web Title: Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat wedding mehndi pics viral