'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातची लोकप्रिय मालिकेत धमाकेदार एन्ट्री, साकारणार खलनायिकेची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 14:11 IST2023-10-31T14:10:44+5:302023-10-31T14:11:36+5:30

हास्यजत्रेतून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली वनिता आता मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

maharashtrachi hasyajatra fame vanita kharat to play role in sundari marathi serial | 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातची लोकप्रिय मालिकेत धमाकेदार एन्ट्री, साकारणार खलनायिकेची भूमिका

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातची लोकप्रिय मालिकेत धमाकेदार एन्ट्री, साकारणार खलनायिकेची भूमिका

टीव्हीवरील अत्यंत लाडक्या असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधील कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. महाराष्ट्रातील घराघरात या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. अनेक कलाकारांना या शोमुळेच लोकप्रियता मिळाली. अभिनेत्री वनिता खरातच्या लोकप्रियतेतही हास्यजत्रेमुळे भर पडली. हास्यजत्रेतून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली वनिता आता मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

विविधांगी भूमिका आणि अचूक विनोदाचं टायमिंग साधत वनिता प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करते. हास्यजत्रेतून तिने अभिनयाची जादू प्रेक्षकांवर पाडली. आता वनिता प्रसिद्ध मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. वनिता सन मराठी वाहिनीवरील 'सुंदरी' या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. लवकरच या मालिकेत वनिताची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. या मालिकेचा प्रोमो व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. 

'सुंदरी' मालिकेत वनिता खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये वनिताचा हटके लूक पाहायला मिळत आहे. वनिताने काळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. बारीक केस, कपाळावर टिकली असा लूक वनिताचा या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तिच्या या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वनिताला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही आतुर आहेत. 

याआधी वनिता 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' मालिकेत झळकली होती. वनिताने अनेक चित्रपटांतही काम केलं आहे. शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग' चित्रपटातील तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं होतं. 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame vanita kharat to play role in sundari marathi serial