महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, थाटात पार पडला विवाहसोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 11:45 IST2023-02-03T09:07:38+5:302023-02-03T11:45:20+5:30
'महाराष्ट्राच्या हास्यजत्रा' या शोमधील तुमची आमची लाडकी वनीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, थाटात पार पडला विवाहसोहळा
'महाराष्ट्राच्या हास्यजत्रा' या शोमधील तुमची आमची लाडकी वनी अर्थात वनिता खरात (Vanita Kharat) लग्नबंधनात अडकली आहे. वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली.मोजक्या पाहुण्याच्या आणि मित्रपरिवाराच्या उपस्थित हा विवाह सोहळा थाटात पार पडला. गेल्या अनेकदिवसांपासून सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा होती.
वनिताने लग्नात पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती आणि त्यावर गुलाबी रंगांचा डिझायनर ब्लाऊज व पैठणी शेल्या घेत आपला लूक पूर्ण केला होता. तर सुमितने सुमितने शेरवानी परिधान करत त्यावर फेटा बांधला होता. सोशल मीडियावर वनिता आणि सुमितवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
वनिताच्या प्रीवेडिंग फोटोशूट पासून ते हळदीपर्यंत सगळं फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. वनिताच्या लग्नसोहळ्याला महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकारांनी उपस्थिती होते.
कोण आहे वनिताचा नवरा?
वनिताचा नवरा सुमित लोंढे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे. त्याला फिरण्याची आवड आहे. वनिताने सुमितसोबतचे अनेक फोटोदेखील शेअर केले आहेत. दोघांचेही फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.