'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिताचं लग्नानंतरच्या दिवाळीचं खास सेलिब्रेशन, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 10:09 IST2023-11-13T10:07:35+5:302023-11-13T10:09:19+5:30

"पहिली दिवाळी", वनिताने शेअर केले लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीचे खास फोटो

maharashtrachi hasyajatra fame vanita kharat celebrates first diwali after marriage shared photo | 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिताचं लग्नानंतरच्या दिवाळीचं खास सेलिब्रेशन, शेअर केले फोटो

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिताचं लग्नानंतरच्या दिवाळीचं खास सेलिब्रेशन, शेअर केले फोटो

सध्या सगळीकडेच दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी करतात. बॉलिवूडप्रमाणेच मराठी कलाकारांच्या घरीही दिवाळीची धामधूम असते. यंदाही सेलिब्रिटी मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी करत आहेत. कलाकारांनी दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातनेही यंदा तिची लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली. 

वनिताने इन्स्टाग्रामवरुन पहिल्या दिवाळीच्या खास सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीसाठी वनिताने खास पारंपरिक लूक केल्याचं फोटोत दिसत आहे. वनिता आणि तिचा नवरा सुमितने दिवाळीसाठी खास ट्विनिंग केलं होतं. वनिताने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. तर सुमितने त्याच रंगाचा कुर्ता परिधान केला होता. लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीसाठी दोघांनीही मराठमोळा लूक केला होता. 

वनिता खरात ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लाडक्या शोमधून वनिता घराघरात पोहोचली. दमदार अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत वनिता प्रेक्षकांना खळखळून हसवते. अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या वनिताचा चाहता वर्गही मोठा आहे. वनिता सोशल मीडियावरुवन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.  

मराठीप्रमाणेच तिने हिंदीतही अभिनयाची छाप पाडली. शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग' चित्रपटात वनिता झळकली होती. या सिनेमातील तिचा सीन व्हायरल झाला होता. वनिताने अनेक मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. सध्या ती सन मराठीवरील 'सुंदरी' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame vanita kharat celebrates first diwali after marriage shared photo