प्रियदर्शनी इंदलकरच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री; फोटो शेअर करत दिली गुडन्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 15:57 IST2023-08-27T15:56:25+5:302023-08-27T15:57:09+5:30
Priyadarshini indalkar: प्रियदर्शनीने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली.

प्रियदर्शनी इंदलकरच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री; फोटो शेअर करत दिली गुडन्यूज
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. उत्तम अभिनयशैली आणि स्वभावातील मनमोकळेपणा यामुळे प्रियदर्शनीने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंस केलं. त्यामुळे सोशल मीडियावर कायम तिची चर्चा रंगत असते. प्रियदर्शनी सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतीच तिने एक गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
प्रियदर्शनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. यात बऱ्याचदा ती तिच्या खासगी आयुष्यात घडणाऱ्या गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करते. अलिकडेच प्रियदर्शनीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या तिच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याची एन्ट्री झाल्याचं तिने सांगितलं आहे.
"२३.०८.२३ New member added to the family ! वाढदिवसाला अनेकांनी विश केलं, “तुझी स्वप्न पूर्ण होवोत” … त्या सर्वांना ‘Thank you’ ! आणि माझ्यासोबत माझ्या आनंदात नाचणाऱ्या सर्वांचेही तितकेच अभिनंदन ! PS - या सगळ्या फोटोंमध्ये आनंद ओसांडुन वाहतोय पण Number 7 … IS THE WINNER !", असं म्हणत प्रियदर्शनीने ही पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, प्रियदर्शनीने maruti suzuki nexa igloo ही नवीन गाडी खरेदी केली आहे. प्रियदर्शनीने तिच्या स्वकष्टातून ही कार खरेदी केल्यामुळे तिच्यासाठी ती खूपच जास्त स्पेशल आहे. तिचा चेहऱ्यावर आनंद दिसत असून सेलिब्रिटींसह चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.