"१० वर्षांपूर्वी तुमच्याबरोबर नाटकात काम करून...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये आलेल्या अशोक सराफ यांच्यासाठी ओंकारची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 09:54 IST2024-08-06T09:54:13+5:302024-08-06T09:54:47+5:30

हास्यजत्रेत विनोदाचा बादशहा अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. ओंकारने अशोक सराफ यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट करत खास पोस्ट लिहिली आहे.

maharashtrachi hasyajatra fame onkar raut shared special post for ashok saraf | "१० वर्षांपूर्वी तुमच्याबरोबर नाटकात काम करून...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये आलेल्या अशोक सराफ यांच्यासाठी ओंकारची पोस्ट

"१० वर्षांपूर्वी तुमच्याबरोबर नाटकात काम करून...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये आलेल्या अशोक सराफ यांच्यासाठी ओंकारची पोस्ट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असा कार्यक्रम आहे. अभिनय आणि अफलातून विनोदाची सांगड घालत या शोमधील हास्यवीर प्रेक्षकांना पोट धरुन हसवात. हास्यजत्रेने अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. ओंकार राऊतही अशाच कलाकारांपैकी एक आहे. अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेल्या ओंकारला हास्यजत्रेमुळे प्रसिद्धी मिळाली. ओंकार सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

नुकतीच हास्यजत्रेत विनोदाचा बादशहा अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. ओंकारने अशोक सराफ यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट करत खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने अशोक सराफ यांनी त्याचं कौतुक केल्याचंही म्हटलं आहे. 

ओंकार राऊतची पोस्ट 

बरोबर दहा वर्षांनी भेट झाली! खूप छान वाटलं! काय लिहू? काय नको? हे कळत नाहीये. तुमच्या सोबत काम करण हे अनेकांचं स्वप्न असत आणि ते स्वप्न माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकातच पूर्ण झालं! 

तेव्हा जे जे तुमच्याकडून शिकलो ते आता थोडफार वापरण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला भेटून तुम्ही माझ्याशी काय बोलाल याची उत्सुकता होती.

“आता अजून चांगल करायला लागलास रे!! गुड! कीप इट अप!!” हे वाक्य तुमच्या तोंडून ऐकलं आणि मी धन्य झालो!! Thank You अशोक मामा!!

MHJ चे skits बघताना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाच जास्त भारी वाटलं.


ओंकारच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. दरम्यान, ओंकार फ्रेशर्स या मालिकेतून घराघरात पोहोचला. त्याने टाइमपास, टाइमपास ३, फुलपाखरू, लकडाऊन बी पॉझिटिव्ह या सिनेमांमध्येही काम केलं आहे. तर काळे धंदे या वेब सीरिजमध्येही तो झळकला होता. 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame onkar raut shared special post for ashok saraf