गौरव मोरेनंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या आणखी एका कलाकाराची CHYDमध्ये एन्ट्री, म्हणाला...
By कोमल खांबे | Updated: July 30, 2025 15:33 IST2025-07-30T15:32:43+5:302025-07-30T15:33:39+5:30
'चला हवा येऊ द्या'मध्ये फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे परिक्षकाच्या भूमिकेत आहे. गौरव मोरेनंतर महाराष्ट्राची हास्यजत्रामधीलच आणखी एका अभिनेत्याने 'चला हवा येऊ द्या'मध्ये एन्ट्री घेतली आहे.

गौरव मोरेनंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या आणखी एका कलाकाराची CHYDमध्ये एन्ट्री, म्हणाला...
'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कॉमेडी शोचं नवं पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पर्वात महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रसिद्धी मिळवलेल्या गौरव मोरेनेही एन्ट्री घेतली. 'चला हवा येऊ द्या'मध्ये फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे परिक्षकाच्या भूमिकेत आहे. गौरव मोरेनंतर महाराष्ट्राची हास्यजत्रामधीलच आणखी एका अभिनेत्याने 'चला हवा येऊ द्या'मध्ये एन्ट्री घेतली आहे. हा अभिनेता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून निमिष कुलकर्णी आहे.
निमिष कुलकर्णीने अभिनयाची चुणूक आणि विनोदबुद्धी दाखवत हास्यजत्रेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. आता 'चला हवा येऊ द्या'मधून निमिषची नवी इनिंग सुरू होत आहे. पण, यामध्ये निमिष एक वेगळी भूमिका पार पडणार आहे. 'चला हवा येऊ द्या'मध्ये निमिष दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अल्ट्रा मराठी बझ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत निमिषने याचा खुलासा केला.
निमिष म्हणाला, "कॉलेजमध्ये असताना मी दिग्दर्शन करायचो. काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक म्हणून माझा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला. प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव यांचं थेट तुमच्या घरातून हे नाटक दिग्दर्शित करायची संधी मला मिळाली. प्रसाद दादाने हे नाटक लिहिलंय आणि त्यानेच ते दिग्दर्शित केलंय. प्रसाद दादाने मला हे नाटक असिस्ट करायची संधी दिली. तेव्हा मला जाणवलं की हे मला आवडतंय. आणि मला यात अजून काम करायचंय".
"१० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करून 'चला हवा येऊ द्या' दीड वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही महिन्यांपूर्वी मला याबाबत विचारणा झाली. आणि मला ही संधी सोडायची नव्हती. अशा प्रकारचा एका शोमध्ये मी आधी काम केलं आहे. अभिनय केलाय. पण, या शोमध्ये मी दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मी खूप उत्सुक आहे. आणि तितकंच दडपणही आलेलं आहे", असं निमिषने सांगितलं.