'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्यासाठी गौरव मोरेची पोस्ट, शरीब हाश्मी कमेंट करत म्हणाला- भाई...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 11:38 IST2024-01-25T11:31:55+5:302024-01-25T11:38:53+5:30
गौरवने बॉलिवूड अभिनेता शरीब हाश्मीच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली आहे.

'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्यासाठी गौरव मोरेची पोस्ट, शरीब हाश्मी कमेंट करत म्हणाला- भाई...
फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता गौरव मोरेने अल्पावधीतच कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं. उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरव प्रेक्षकांना पुरेपूर हसवतो. त्याचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. गौरव सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत त्याचे आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असतो. सध्या गौरवच्या अशाच एका पोस्टची चर्चा रंगली आहे.
गौरवने बॉलिवूड अभिनेता शरीब हाश्मीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 'फॅमिली मॅन' या वेब सीरिजमधून घराघरात पोहोचलेल्या शरीब हाश्मीचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त गौरवने त्याच्याबरोबरचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मोठे बंधू...तुमच्यासारखं कोणी नाही", असं कॅप्शन गौरवने या फोटोला दिलं आहे. गौरवच्या या पोस्टवर शरीब हाश्मीनेही कमेंट केली आहे. "अरे माझ्या भावा थँक्यू सो मच...तू मस्त आहेस," अशी कमेंट शरीबने केली आहे.
दरम्यान, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेला गौरवने अनेक मराठी सिनेमांतही काम केलं आहे. गौरव लवकरच हिंदी सिनेमातही झळकणार आहे. 'संगी' या हिंदी चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात गौरव शरीब हाश्मी, विद्या मालवडे, संजय बिश्नोईबरोबर काम करणार आहे.