बॉबी देओलच्या 'जमाल कुडु'वर गौरव मोरेची भन्नाट रील, अभिनेत्याचा अवतार पाहून सई म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 16:09 IST2023-12-20T16:08:10+5:302023-12-20T16:09:30+5:30
सेलिब्रिटींनाही 'ॲनिमल'मधील 'जमाल कुडु' गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने या गाण्यावर रील बनवला आहे.

बॉबी देओलच्या 'जमाल कुडु'वर गौरव मोरेची भन्नाट रील, अभिनेत्याचा अवतार पाहून सई म्हणाली...
सध्या जिकडेतिकडे 'ॲनिमल'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. या सिनेमाप्रमाणेच त्यातील गाण्यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. 'ॲनिमल'मधील बॉबी देओलच्या जमाल कुडु गाण्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. या गाण्याच्या रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सेलिब्रिटींनाही 'ॲनिमल'मधील 'जमाल कुडु' गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने या गाण्यावर रील बनवला आहे.
'ॲनिमल'मधील 'जमाल कुडु' गाण्याची भुरळ गौरवलाही पडली आहे. या गाण्याचा रील व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत गौरवने भन्नाट लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचा हा लूक अलिकडेच प्रदर्शित झालेल्या एका सिनेमातील आहे. या व्हिडिओत गौरव समुद्रकिनारी चालताना दिसत आहे. गौरव मोरेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
गौरवचा हा हटके लूक पाहून सई ताम्हणकर अवाक् झाली आहे. तिने गौरवच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे. "ओह" अशी कमेंट सईने केली आहे. याआधी 'जमाल कुडु'वर ऐश्वर्या-अविनाश नारकर, मानसी नाईक या कलाकारांनी डान्स करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. दरम्यान, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रसिद्धीझोतात आलेला गौरव अनेक मराठी चित्रपटांतही झळकला आहे.