हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 15:00 IST2025-12-22T14:59:29+5:302025-12-22T15:00:03+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे प्रियदर्शिनी लग्नाच्या बेडीत अडकणार की काय? अशा चर्चा रंगल्या आहेत.

हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू आहे. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारी-सोहम बांदेकर, तेजस्विनी लोणारी, मेघन जाधव-अनुष्का पिंपुटकर यांनी सप्तपदी घेतल्या. आता आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे प्रियदर्शिनी लग्नाच्या बेडीत अडकणार की काय? अशा चर्चा रंगल्या आहेत.
प्रियदर्शिनीच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ती एका नव्या नवरीसारखी नटल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तर त्यावर हिरव्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज घातला आहे. नवरीसारखे दागिनेही तिने घातले आहेत. प्रियदर्शिनीच्या हातावर मेहेंदी आणि हातात हिरवा चुडाही दिसत आहे. तर डोक्याला मुंडावळ्या बांधल्या आहेत. प्रियदर्शिनीचा हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. प्रियदर्शिनी लग्नाच्या बेडीत अडकणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आता प्रियदर्शिनी खरंच लग्न करतेय की कोणत्या प्रोजेक्टसाठी अभिनेत्रीने हा लूक केला आहे, हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.

प्रियदर्शिनीला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे विशेष प्रसिद्धी मिळाली. प्रियदर्शिनीचे स्किट चाहत्यांना आवडतात. तिने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'फुलराणी', 'गाडी नंबर १७६०', 'चिकी चिकी बूबूबुम', 'नवरदेव बीएसी अॅग्रिकल्चर', 'दशावतार' या सिनेमांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली.