साता जन्माचे सोबती!'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ईशा डे अडकली लग्नबेडीत, नवऱ्याचं मनोरंजनविश्वाशी कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 09:44 IST2026-03-12T09:37:38+5:302026-03-12T09:44:28+5:30
खणकरांची सून! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ईशा डे अडकली लग्नबंधनात, कोण आहे नवरा?

साता जन्माचे सोबती!'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ईशा डे अडकली लग्नबेडीत, नवऱ्याचं मनोरंजनविश्वाशी कनेक्शन
Esha Dey: मराठी कलाविश्वात सध्या कलाकारांची लगीनघाई सुरू असून काही कलाकारांनी लग्न केलं आहे. अपूर्वा नेमळेकर,एतिशा सांझगिरी या अभिनेत्रींचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. अशातच आता महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री देखील लग्नबंधनात अडकला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ईशा डे आहे.
गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांमध्ये अभिनेत्री ईशा डेच्या लग्नाची चर्चा सुरु होती.अचानक सोशल मीडियावर तिच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटो समोर आल्याने चाहत्यांना सुखद धक्काच बसला होता. ईशा डे कोणाशी लग्न करणार याची उत्सुकता अनेकांना होती. अखेच ईशाच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा समोर आला आहे. नुकतीच अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाला हास्यजत्राचे कलाकार हजर होते.

दरम्यान, सोशल मिडिया वनिता खरातने ईशा डेच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत.ईशाने तिच्या लग्नात लाल रंगाची नऊवारी साडी नेसली असून पारंपरिक लूक केल्याचा पाहायला मिळतोय. तर अभिनेत्रीच्या नाकातील नाथीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तर अभिषेकने मेहदी रंगाचा कुर्ता आणि धोतर नेसून लूक केला आहे.या फोटोंमध्ये दोघंही खूप सुंदर दिसत आहेत.
कोण आहे अभिनेत्री नवरा?
अभिषेक खणकर हा गीतकार आहे. त्याने अनन्या चित्रपट गाणी तसेच झी मराठीच्या लक्ष्मी निवास, खुलता कळी खुलेना मालिकेचे शीर्षक गीत लिहिलं आहे. यासोबतच तो 'विझोट कंपनी' नावाने पॉडकास्ट करतो.