जबरदस्तीने कपडे 'स्त्री'चे काढले जातात पण...; 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची समाजाला आरसा दाखवणारी मार्मिक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 11:02 IST2024-08-24T11:00:46+5:302024-08-24T11:02:42+5:30
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने बदलापूर अत्याचार प्रकरणावर दोन वाक्यात केलेली मार्मित पोस्ट चर्चेत आहे

जबरदस्तीने कपडे 'स्त्री'चे काढले जातात पण...; 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची समाजाला आरसा दाखवणारी मार्मिक पोस्ट
बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतील चिमुरड्या विद्यार्थिंनींवर अत्याचार झाला. याप्रकरणी आरोपीला अटक झाली. बदलापूरमधील अनेक रहिवाशी यामुळे रस्त्यावर उतरले. बदलापूरमधील लोकांनी रेल्वे रुळावर उतरुन तब्बल ८ तास आंदोलन केलं. सरकारला जाब विचारला. बदलापूर प्रकरणाचा सर्वच स्तरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता श्रमेश बेटकरने या प्रकरणावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.
श्रमेशने लिहिलेली संवेदनशील पोस्ट
श्रमेशने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिलीय. यात तो लिहितो, "जबरदस्तीने कपडे 'स्त्री'चे काढले जातात पण संपूर्ण 'पुरुषी' समाजव्यवस्था 'नग्न' होते". अशी मार्मिक पोस्ट श्रमेशने लिहिली आहे. श्रमेशच्या या पोस्टवर 'अगदी बरोबर', 'सत्य परिस्थिती आहे', 'अगदी बरोबर... करणारी एक व्यक्ती पण संपूर्ण जमात बदनाम होते', अशा कमेंट करुन लोकांनी या पोस्टला समर्थन दिलं आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरण
बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्ररकरणी आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आलीय. राज्यासह देशभरातून या प्रकरणाविषयी रोष व्यक्त केला. राज्यातही या प्रकरणाच्या निषेधार्थ नागरिक रस्त्यावर उतरले होते. या प्रकरणी मोठा जनक्षोभ उसळला. आज महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट् बंदची हाक देण्यात आली होती. पण कोर्टाने संप बेकायदेशीर ठरवल्याने संप मागे घेण्यात आला.