'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 09:14 IST2025-12-06T09:10:47+5:302025-12-06T09:14:58+5:30
अभिनय आणि कॉमेडीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा निमिष कुलकर्णीने लग्न करत त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. निमिषच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
सध्या मराठी कलाविश्वात सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारी-सोहम बांदेकर यांच्यानंतर आता आणखी एक अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचं लग्न झालं आहे. अभिनय आणि कॉमेडीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा निमिष कुलकर्णीने लग्न करत त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. निमिषच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. निमिषने कोमल भास्कर हिच्यासोबत सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
निमिषने लग्नासाठी खास पारंपरिक लूक केला होता. निमिषने केशरी रंगाचं धोतर आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. या लूकमध्ये तो राजबिंडा दिसत होता. तर त्याच्या पत्नीने केशरी रंगाची नऊवारी साडी नेसली होती. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत आणि त्यांच्या आशीर्वादाने निमिष आणि कोमल यांनी लग्नगाठ बांधली. सप्तपदी घेत कायम एकत्र राहण्याचं वचन त्यांनी एकमेकांना दिलं. निमिषच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी निमिषला शुभेच्छा देत त्याचं अभिनंदन केलं आहे.

काहीच महिन्यांपूर्वी निमिषचा साखरपुडा झाला होता. तर त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींचे फोटोही समोर आले होते. निमिषला महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमुळे प्रसिद्धी मिळाली. काही मालिका आणि सिनेमांमध्येही तो झळकला आहे. याशिवाय काही नाटकांमध्येही त्याने काम केलं आहे. निमिषची पत्नी कोमलचंही कलाविश्वाशी खास कनेक्शन आहे. कोमल मराठी सिनेसृष्टीत सक्रिय आहे. तिने मालिकांची क्रिएटिव्ह हेड म्हणून काम पाहते.