अभिनंदन! 'हास्यजत्रा' फेम कलाकाराच्या पत्नीला मिळाली डॉक्टरेट, कॅन्सरग्रस्त रुग्णांवर प्रबंध लिहून केली पीएचडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 11:46 IST2025-09-24T11:45:06+5:302025-09-24T11:46:20+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी डॉक्टरेट झाली असून त्यांनी एका महत्वाच्या विषयात पीएचडी मिळवली आहे

maharashtrachi hasyajatra director sachin goswami wife savita goswami got phd doctorate | अभिनंदन! 'हास्यजत्रा' फेम कलाकाराच्या पत्नीला मिळाली डॉक्टरेट, कॅन्सरग्रस्त रुग्णांवर प्रबंध लिहून केली पीएचडी

अभिनंदन! 'हास्यजत्रा' फेम कलाकाराच्या पत्नीला मिळाली डॉक्टरेट, कॅन्सरग्रस्त रुग्णांवर प्रबंध लिहून केली पीएचडी

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो प्रेक्षकांच्या आवडीचा. या शोमधील सर्वच कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलंय. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे कलाकार इतके प्रसिद्ध आहेत की त्यांच्या कुटुंबावरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील एका कलाकाराच्या पत्नीने थेट डॉक्टरेट मिळवली आहे. या कलाकाराने खास शब्दात पत्नीसाठी पोस्ट लिहून तिचं अभिनंदन केलंय. हे कलाकार आहेत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन गोस्वामी.

सचिन गोस्वामींच्या पत्नीला मिळाली डॉक्टरेट

सचिन गोस्वामींनी पत्नी सविता गोस्वामी सन्मान स्वीकारतानाचा फोटो - व्हिडीओ शेअर केले आहेत. सचिन गोस्वामी लिहितात, ''श्रीमती सविता गोस्वामी आता डॉ.सविता गोस्वामी झाल्या आहेत..अभिनंदन सविता. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सायको अंकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत असून या सर्व व्यापातूनआणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत, जिद्दीने कॅन्सर पीडित आणि आताचे सर्वाईवर मुलांवर संशोधनात्मक प्रबंध लिहिण आणि पीएचडी मिळवणं सोपं नव्हतं पण तू ते पूर्ण केलस..खूप अभिमान आणि प्रेम''

अशा शब्दात सचिन यांनी सविता गोस्वामीचं कौतुक केलंय. सचिन आणि सविता यांनी एकमेकांच्या करिअरला कायमच सपोर्ट केला आहे. सचिन यांनी पोस्ट टाकताच त्यांच्या चाहत्यांनी आणि हास्यजत्रेतल्या कलाकारांनी त्यांचं अभिनंदन केलंय. सचिन गोस्वामींच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ते सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं दिग्दर्शन करत आहेत. शिवाय त्यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला 'गुलकंद' हा सिनेमा चांगलाच गाजला. 

Web Title: maharashtrachi hasyajatra director sachin goswami wife savita goswami got phd doctorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.