Vanita Kharat Video : “या माझ्या सासूबाई, पण मी तिला...”, वनिता खरात हिने अशी करून दिली सासूबाईंची ओळख
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 13:08 IST2023-03-13T13:07:26+5:302023-03-13T13:08:22+5:30
Maharashtrachi hasya jatra show fame Vanita Kharat : लग्नानंतर वनिता व सुमीत दोघंही आपआपल्या कामावर परतले आहेत. खास म्हणजे, वनिता व सुमीत दोघांनी एक स्वत:चं युट्युब चॅनलही सुरू केलं आहे. या चॅनलवरचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

Vanita Kharat Video : “या माझ्या सासूबाई, पण मी तिला...”, वनिता खरात हिने अशी करून दिली सासूबाईंची ओळख
Maharashtrachi hasya jatra show fame Vanita Kharat : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात नुकतीच लग्नबंधनात अडकली. २ फेब्रुवारीला सुमित लोंढेसोबत तिने लग्नाच्या आणाभाका घेतल्या. लग्नानंतर वनिता व सुमीत दोघंही आपआपल्या कामावर परतले आहेत. खास म्हणजे, वनिता व सुमीत दोघांनी एक स्वत:चं युट्युब चॅनलही सुरू केलं आहे. या चॅनलवरचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. होय, या व्हिडीओत वनिता व सुमीत दोघंही लग्नानंतरचा पहिला सण साजरा करताना दिसत आहेत. सण अर्थातच होळीचा. सुमीत व वनिता दोघांनी अगदी पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा केला. व्हिडीओत वनिताच्या सासरच्या घराची झलक पाहायला मिळतेय. शिवाय वनिताच्या सासूबाईही व्हिडीओत आहेत.
वनिता सासूबाईंची अगदी हटके पद्धतीने ओळख करून देते. सासूबाईंनी बनवलेल्या लुसलुशीत पुरणपोळ्या ती दाखवते. “या माझ्या सासूबाई आहेत. या नाही कारण मी यांना ही असं म्हणते. कारण ती माझी आई आहे. मी हिला आईच म्हणते. तिने आज पुरणपोळ्या बनवल्या आहेत. पुरणपोळ्या मला खूप आवडतात. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आम्ही या पुरणपोळ्या संपवणार आहोत”, असं या व्हिडीओत वनिता म्हणतेय.
वनिता खरात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटात तिने साकारलेली माेलकरणीची भूमिका प्रचंड गाजली होती. गेल्याच महिन्यात तिचा ‘सरला एक कोटी’ हा सिनेमा रिलीज झाला. वनिताचा नवरा सुमित लोंढे याच्याबद्दल म्हणाल तर तो एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे. त्याला फिरण्याची आवड आहे.