अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरला डेंग्यूची लागण; फोटो शेअर करत दिली हेल्थ अपडेट, म्हणते..,
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 17:03 IST2024-09-11T16:59:52+5:302024-09-11T17:03:36+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री प्रियदर्शीनी इंदलकरने सोशल मीडियावर चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी दिली आहे.

अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरला डेंग्यूची लागण; फोटो शेअर करत दिली हेल्थ अपडेट, म्हणते..,
Priyadarshini Indalkar Viral Post : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेत्री प्रियदर्शीनी इंदलकर घराघरात पोहचली. 'फुलराणी' बनून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या पुण्याच्या या विनम्र अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करत तिने नेटरकऱ्यांना तिच्या आजाराबद्दल माहिती दिली आहे.
प्रियदर्शीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये हाताला सलाईन आणि उतरलेला चेहरा अशा अवस्थेत ती दिसत आहे. या स्टोरीच्या माध्यमातून तिला डेंग्यूची लागण झाल्याचं तिने स्पष्ट केलंय. या इन्स्टाग्राम स्टोरीच्या कॅप्शनमध्ये तिने असं लिहित चाहत्यांना तिची अपडेट दिल्याचं पाहायला मिळतंय.
प्रियदर्शिनीचे सोशल मीडियावर बरेच चाहते आहेत. तिच्या फोटोशूटने ती कायम चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. नुकताच तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
मुळची पुण्याची असलेल्या या अभिनेत्रीने 'ई टीव्ही मराठी' या वाहिनीवरील अफलातून मास्टर्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी कलाविश्वात पाऊल ठेवलं. अलिकडेच प्रियदर्शिनी 'फुलराणी' या मराठी सिनेमात मुख्य भूमिकेत दिसली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही झालं होतं. ती शाहिद कपूरच्या 'फर्जी' वेब सीरिजमध्ये झळकली होती.