"अन् अर्धांगवायू झालेला माणूस उठून उभा राहिला", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने सांगितला हृदयस्पर्शी किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 17:47 IST2025-04-19T17:41:23+5:302025-04-19T17:47:25+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली...

"अन् अर्धांगवायू झालेला माणूस उठून उभा राहिला", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने सांगितला हृदयस्पर्शी किस्सा
Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने बऱ्याच नवोदित कलाकारांना ओळख मिळाली. या शोमधून अभिनेत्री ईशा डे हिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आपल्या विनोदी कौशल्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांना आपलसं केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने विनोदाचा माणसाच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो, याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.
नुकतीच समीर चौघुले आणि ईशा डे यांनी 'अमुक तमुक' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यांच्यासोबत धमाल गप्पा मारल्या आहेत. त्यादरम्यान अभिनेत्री ईशा डेने एक किस्सा शेअर केला. त्यादरम्यान अभिनेत्री म्हणाली, "ओंकार राऊतबद्दल एक किस्सा घडला होता की तो असंच काहीतरी खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेला. तिथे छोटसं टपरीसारखं ब्रेड वगैरे मिळणारं दुकान होतं. त्याचठिकाणी खूर्च्यांवर एक माणूस बसला होता. तिथे ओंकार गेला आणि त्याला जे काही घ्यायचं होतं ते घेतलं. तेव्हा तो माणूस ओंकारला पाहून थरथरत होता आणि त्या माणसाने झोपून साष्टांग नमस्कार घातला. पहिल्यांदा ते मस्करी करत आहेत असं वाटलं."
पुढे अभिनेत्रीने सांगितलं. "त्यानंतर त्या माणसाला उठवलं. तेव्हा ते म्हणाले की हास्यजत्रा मी नेहमी बघयाचो. मी काही वर्ष अर्धांगवायू झाला होता आणि एका स्किटला मी इतका हसलो की जागेवरुन उठून उभा राहिलो. हे ऐकून खोटं वाटेल. तो माणूस स्वत: याबद्दल सांगताना ढसाढसा रडत होता. ओंकार सुद्धा रडू लागला. मी पूर्णपणे बरा झालो, असं त्या माणसाने सांगितलं." असा किस्सा अभिनेत्रीने शेअर केला.