पहिल्या केळवणाचा थाट! 'लक्ष्मी निवास' फेम मेघन जाधव लवकरच बांधणार लग्नगाठ, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:30 IST2025-11-01T12:25:27+5:302025-11-01T12:30:21+5:30
मेघन-अनुष्काची लगीनघाई! पार पडलं पहिलं केळवण; फोटो पाहिलेत का?

पहिल्या केळवणाचा थाट! 'लक्ष्मी निवास' फेम मेघन जाधव लवकरच बांधणार लग्नगाठ, फोटो आले समोर
Meghan Jadhav And Anushka Pumputker Kelvan: मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, तेजस्विनी लोणारी मेघन जाधव असे बरेच कलाकार येत्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार आहेत. यापैकी मेघन जाधवच्या घरी आता लगीनघाईला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नुकतंच अभिनेत्याचं पहिलं केळवण पार पडलं आहे. त्याचे फोटो समोर आले आहे.

अगदी काल परवाच मेघन जाधवने त्याच्या सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याच्या प्रेमाची कबुली दिली. मेघनची होणारी पत्नी देखील दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर आहे.अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचे तर ती सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत आहे. लवकरच हे जोडपं लग्नबंधनात अडकत त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. अशातच नुकतंच मेघन आणि अनुष्काचं पहिलं केळवण पार पडलं आहे. लक्ष्मी निवास मालिकेतील मेघनची सहकलाकार अभिनेत्री दिव्या दिव्या पुगांवरकरने त्यांचं पहिलं केळवण साजरं केलं आहे."#ANUMEGH चं केळवण...", असं कॅप्शन देत तिने या जोडप्यासोबतचा सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केलाय.
पहिल्या केळवणासाठी मेघन-अनु्ष्काने पारंपरिक लूक केल्याचा पाहायला मिळतोय. खास फुलांची सजावट करुन अभिनेत्रीने त्यांच्या केळवणाचा बेत केला होता. दरम्यान, मेघन आणि अनुष्काने अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख उघड केलेली नाही. त्यामुळे हे जोडपं कधी लग्न करणार याची त्यांचे चाहते वाट पाहत आहेत.