टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 17:16 IST2025-06-21T17:15:45+5:302025-06-21T17:16:21+5:30

Lata Saberwal Sanjeev Seth Divorce: मराठी अभिनेत्री रेशम टीपणीस ही संजीव सेठ यांची पहिली पत्नी होती. आता दुसऱ्या पत्नीपासूनही संजीव सेठ यांचा संसार मोडला.

Lata Saberwal and Sanjeev Seth announces divorce after 15 years of marriage | टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री लता सबरवाल (Lata Saberwal) आणि अभिनेते संजीव सेठ (Sanjeev Seth) घटस्फोट घेत आहेत. लग्नानंतर १५ वर्षांनी त्यांचा संसार मोडला आहे. लता सबरवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. दोघांना एक मुलगा आहे. लता यांनी पोस्टमध्ये संजीव सेठ यांचे आभार मानले आहेत. तसंच या प्रसंगी प्रायव्हसी द्यावी अशी विनंती माध्यमांना आणि चाहत्यांना केली आहे. 

लता सबरवाल आणि संजीव सेठ दोघंबही हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत लोकप्रिय आहेत. त्यांनी अनेक मालिकामध्ये काम केलं आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत दोघं पती पत्नीच्या भूमिकेत होते. २०१० मध्य लता आणि संजीव सेठ यांनी लग्नगाठ बांधली होती. २०१३ मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव आरव सेठ आहे. आता लग्नानंतर १५ वर्षांनी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले, "प्रदीर्घ शांततेनंतर...मी आज जाहिर करते की मी आण पती संजीव सेठ आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. मला त्यांच्यापासून प्रेमळ मुलगा झाला त्यासाठी त्यांचे आभार. तसंच त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा."

त्या पुढे लिहितात,"माझी सर्वांना विनंती आहे की या प्रसंगी मला आणि माझ्या कुटुंबाला एकांत द्यावा. कोणीही यासंबंधी प्रश्न विचारण्यासाठी संपर्क करु नका. आभार."

लता आणि संजीव सेठ यांनी इतक्या वर्षांनी हा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे. संजीव सेठ हे देखील बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये दिसले आहेत. लता सबरवाल त्यांची दुसरी पत्नी होती. तर त्यांची पहिली पत्नी मराठी अभिनेत्री रेशम टिपणीस होती. १९९३ मध्येच त्यांचं लग्न झालं होतं. रेशमपासूनही त्यांना रिषीका आणि मानव ही दोन मुलं आहेत. २००४ साली रेशम टिपणीससोबत त्यांचा घटस्फोट झाला होता. तसंच लता सबरवाल यांना प्रपोज करण्यापूर्वी त्यांनी मुलांची परवानगी घेतल्याचाही त्यांनी खुलासा केला होता.  

Web Title: Lata Saberwal and Sanjeev Seth announces divorce after 15 years of marriage