'कोण होतीस तू...' फेम अभिनेत्रीची खऱ्या आयुष्यात लगीनघाई! हातावर सजली मेहंदी, फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 11:24 IST2026-02-04T11:22:45+5:302026-02-04T11:24:10+5:30

आली लग्नघटिका समीप! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री लवकरच बोहोल्यावर चढणार, थाटात पार पडला मेहंदी सोहळा

kon hotis tu kay jhalis tu serial fame sakshi mahajan mehendi ceremony soon tie knot with atharv karve photo viral | 'कोण होतीस तू...' फेम अभिनेत्रीची खऱ्या आयुष्यात लगीनघाई! हातावर सजली मेहंदी, फोटो आला समोर

'कोण होतीस तू...' फेम अभिनेत्रीची खऱ्या आयुष्यात लगीनघाई! हातावर सजली मेहंदी, फोटो आला समोर

Sakshi Mahajan Mehendi Ceremony: सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत.तर काही जण आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसत आहेत. नुकताच मराठी अभिनेता सिद्धार्थ खिरिड लग्नबंधनात अडकला. तर येत्या काही दिवसांत अभिनेत्री रेवती लेले सुद्धा लवकरच बोहोल्यावर चढणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीच्या घरी सनई-चौघडे वाजण्यास सुरुवात झाली आहे.


‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री साक्षी महाजनचा मेहंदी सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेमुळे साक्षी महाजन प्रचंड चर्चेत आली आहे. या मालिकेत अभिनेत्रीने‘विद्या’ ही भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण, तरीही त्याच्या सगळ्या चाहत्यांना साक्षीच्या लग्नाबद्दल उत्सुकता आहे.

दरम्यान, नुकतेच तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. या मेहंदी सोहळ्यासाठी साक्षीने मोरपिशी रंगाचा सुंदर ड्रेस, सुंदर दागिने असा लूक केला होता. तिच्या हातावर सुंदर अशी मेहंदी रेखाटल्याचं पाहायला मिळत आहे.

साक्षी महाजनचा होणाऱ्या नवऱ्याचं नाव अथर्व कर्वे आहे. अथर्व कर्वे हा कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. अथर्व आणि साक्षीची पहिली भेट ही विठू माऊली मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर ७ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते दोघेही लग्न करत आहेत. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. 

Web Title : 'कौन होतीस तू...' फेम अभिनेत्री साक्षी महाजन की शादी की धूम!

Web Summary : 'कौन होतीस तू' से मशहूर साक्षी महाजन शादी कर रही हैं। मेहंदी समारोह की तस्वीरें सामने आईं। साक्षी, अभिनेता अथर्व कर्वे से शादी करेंगी। वे 'विठू माऊली' के सेट पर मिले और सात साल के रिश्ते के बाद शादी कर रहे हैं।

Web Title : 'Kon Hotis Tu...' actress Sakshi Mahajan's wedding bells ring!

Web Summary : Actress Sakshi Mahajan, famed for 'Kon Hotis Tu,' is getting married. Her Mehendi ceremony photos are out. Sakshi will marry Atharva Karve, an actor. They met on the set of 'Vithu Mauli' and are marrying after seven years of relationship.