'कॉफी विद करण' मध्ये 'दीपवीर' ची एन्ट्री, 2015 मध्येच एन्गेज झाल्याचा केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 09:28 AM2023-10-23T09:28:00+5:302023-10-23T09:29:17+5:30

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह या एपिसोडमध्ये अगदीच कूल अंदाजात दिसले.

Koffee with Karan season 8 ranveer singh and deepika padukone first guest will open many secrets | 'कॉफी विद करण' मध्ये 'दीपवीर' ची एन्ट्री, 2015 मध्येच एन्गेज झाल्याचा केला खुलासा

'कॉफी विद करण' मध्ये 'दीपवीर' ची एन्ट्री, 2015 मध्येच एन्गेज झाल्याचा केला खुलासा

करण जोहरच्या 'कॉफी विद करण' (Koffee With Karan) चा आठवा सिझन लवकरच येत आहे. या शोमध्ये रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हे पॉवर कपल पहिले पाहुणे आहेत. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये दोघांनी एक मोठा खुलासाही केल्याचं दिसतंय. रणवीर-दीपिका २०१५ मध्येच एंगेज झाल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला. त्यामुळे चाहत्यांना धक्काच बसलाय. 
 
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह या एपिसोडमध्ये अगदीच कूल अंदाजात दिसले. दोघांनी ब्लॅक आऊटफिटमध्ये एन्ट्री घेतली. नेहमीप्रमाणेच हे कपल रॉयल दिसत आहे. रणवीरची मजामस्ती आणि दीपिकाचा सुपरहॉट लुक तर करण जोहरचे प्रश्न असं एकंदरच हा एपिसोड धमाकेदार असणार यात शंका नाही. 

प्रोमोमध्ये रणवीर दीपिकाला खांद्यावर किस करतो. तर तो करण जोहरला '... अंकल'ही म्हणताना दिसत आहे. शिवाय दीपिकाने ऋतिकसोबत आपली बेस्ट केमिस्ट्री दिसेल असंही म्हटले. दीपिका-ऋतिक रोशन ही जोडी 'फायटर' सिनेमात दिसणार आहे. इतकंच नाही तर करण जोहर म्हणाला की तुम्ही आधीच एंगेज झाले होतात? तर रणवीर म्हणतो, मी 2015 मध्येच तिला प्रपोज केलं. कोणी दुसरं  येईल त्याआधीच मी आपली चप्पल आणून ठेवतो.

शोच्या अपेक्षित पाहुण्यांपैकी कार्तिक आर्यन, रोहित शेट्टी आणि अजय देवगण, सारा अली खान आणि अनन्या पांडे, आलिया भट आणि करीना कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि वरुण धवन या शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. तथापि, शोच्या पुष्टी झालेल्या पाहुण्यांची यादी अद्याप समोर आलेली नाही. 'कॉफी विथ करण सीझन 8' ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉट स्टारवर स्ट्रीम केला जाईल. हा शो २६ ऑक्टोबर, २०२३ रोजी प्रसारित होईल.

Web Title: Koffee with Karan season 8 ranveer singh and deepika padukone first guest will open many secrets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.