बिग बॉस मराठी २ मधील या सदस्यांनी सई, पुष्कर आणि मेघा प्रमाणे बनवला आपला ग्रुप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 15:58 IST2019-05-30T15:54:56+5:302019-05-30T15:58:37+5:30
बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये देखील सई, पुष्कर आणि मेघा यांचा छान ग्रुप जमला होता. शर्मिष्ठा राऊतची या कार्यक्रमात एंट्री झाल्यानंतर ती देखील या ग्रुपचा एक भाग बनली.

बिग बॉस मराठी २ मधील या सदस्यांनी सई, पुष्कर आणि मेघा प्रमाणे बनवला आपला ग्रुप
बिग बॉस म्हटला की, या घरात काही जण एकमेकांचे चांगले फ्रेंड्स बनतात तर काही जण एकमेकांचे चेहरे पाहायला देखील तयार नसतात. बिग बॉसचा कुठल्याही भाषेमधला सिझन असो या कार्यक्रमातील टीम सदस्यांच्या भांडणामुळेच हा कार्यक्रम चर्चेत असतो. बिग बॉसच्या घरात बनले जाणारे ग्रुप हे तर बिग बॉसचे वैशिष्ट्य असते.
बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये देखील सई, पुष्कर आणि मेघा यांचा छान ग्रुप जमला होता. शर्मिष्ठा राऊतची या कार्यक्रमात एंट्री झाल्यानंतर ती देखील या ग्रुपचा एक भाग बनली. या ग्रुप मध्ये बरीच भांडणं, वाद झाले. तसेच त्यांच्यात अनेक गैरसमज देखील निर्माण झाले होते. पण तरीही ते एकत्र राहिले. अनेकवेळा हा ग्रुप तुटतो की, काय अशी शंका देखील आली. पण तो ग्रुप तुटता तुटता वाचला. त्याचसोबत रेशम, सुशांत, राजेश, आस्ताद यांचा ग्रुप देखील बराच चर्चेत राहिला आणि आता बिग बॉस मराठी २ चा पहिला ग्रुप तयार होताना दिसत आहे आणि तो म्हणजे KVR .
KVR या ग्रुपमध्ये किशोरी शहाणे, वीणा जगताप आणि रुपाली भोसले असून या तिघींनी गप्पा मारण्यासाठी एक जागा देखील ठरवून ठेवली आहे आणि त्याचे “KVR कट्टा” असे नाव देखील ठेवले आहे. या नावाला किशोरी शहाणे यांनी संमती देखील दिली आहे. या ग्रुप मध्ये अजून कोणाचा समावेश होईल? या तिघींचा ग्रुप शेवटपर्यंत टिकून राहील? हे बघणे रंजक असणार आहे.
अनेक लोक एकत्र आले की, भांड्याला भांडं लागणारच, शब्दाला शब्द लागणारच आणि गैरसमज होणारच... त्यात बिग बॉसचे घर म्हटले की हे स्वाभाविकच आहे. कारण वेगवेगळ्या क्षेत्रातील १५ कलाकार एकत्र आले म्हणजे एकमेकांचा स्वभाव समजणे, त्यांच्या सवयी समजून घ्यायला वेळ लागतोच. मराठी टेलिव्हिजनवरील दोन लोकप्रिय अभिनेत्री राधा म्हणजेच वीणा जगताप आणि शिवानी सुर्वे यांचे घरामध्ये तसे चांगले जमत होते. पण आता या दोघींमध्ये वाद होताना दिसणार आहे. आता हा वाद कशामुळे रंगला हे आजच्या भागात कळेलच.