Kiran Mane : 'राजकीय भूमिकेमुळे मालिकेतून काढून टाकलं जातं का?'; किरण माने प्रकरणी अमोल कोल्हेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 18:30 IST2022-01-15T18:29:55+5:302022-01-15T18:30:45+5:30
अभिनेते किरण माने (Kiran Mane) प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Kiran Mane : 'राजकीय भूमिकेमुळे मालिकेतून काढून टाकलं जातं का?'; किरण माने प्रकरणी अमोल कोल्हेंचा सवाल
मुलगी झाली हो' (Mulgi zali Ho) मालिकेतील अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांना मालिकेतून तडकाफडकी काढून टाकल्यानंतर सगळीकडे खळबळ माजली आहे. राजकीय भूमिका फेसबुकवर मांडल्यामुळे आपल्याला मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवल्याचा दावा किरण माने यांनी केला होता. त्यांनतर सर्वच स्तरातून याचा निषेध केला जात आहे. या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
अभिनेते अमोल कोल्हे यांंनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील एक फोटो आणि एक राजकीय क्षेत्रातील फोटो शेअर केला आहे. हे फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये विचारले की, 'राजकीय भूमिकेमुळे मालिकेतून काढून टाकलं जातं का?'
मराठी सीरियल्सच्या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत काय म्हटले हे सांगितले आहे. यामध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं की, 'मला हा विषय महत्वाचा वाटतो. अशा पद्धतीनं खरेच होते का? समाज माध्यमांवर राजकीय भूमिका घेतल्यास कलाकारांना मालिकांमधून काढले जाते का? हे मला सांगायचे आहे. जी गोष्ट मला पटत नाही त्याबद्दल मी सातत्याने सांगत आलो आहे. मात्र मला अशा प्रकराचा अनुभव कधीच आलेला नाही'. अमोल कोल्हेच्या पोस्टवरून स्पष्ट होते की त्यांनी किरण माने यांना पाठिंबा दिला आहे.