'फोडणीचा भात अन्...' लोकप्रिय मराठी टीव्ही कपलने बनवलेला पदार्थ पाहून तुम्हीही चक्रावून जाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 13:57 IST2023-03-14T13:55:31+5:302023-03-14T13:57:16+5:30
या मराठी अभिनेता आणि पत्नीने नुकताच पोस्ट केलेला एक व्हिडिओ सध्या ट्रोल होतोय कारण त्यांनी बनवलेला पदार्थ नेटकऱ्यांना काही रुचला नाहीए.

'फोडणीचा भात अन्...' लोकप्रिय मराठी टीव्ही कपलने बनवलेला पदार्थ पाहून तुम्हीही चक्रावून जाल!
मराठी टीव्हीविश्वातील लाडकं कपल संग्राम साळवी (Sangram Salvi) आणि खुशबू तावडे (Khushboo Tawde) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. खुशबू आणि संग्राम दोघांनाही स्वयंपाकाची आवड आहे. त्यामुळे काम, शूट सांभाळत दोघेही सुट्टीच्या दिवशी विविध रेसिपी करत असतात. मात्र त्यांनी नुकताच पोस्ट केलेला एक व्हिडिओ सध्या ट्रोल होतोय कारण त्यांनी बनवलेला पदार्थ नेटकऱ्यांना काही रुचला नाहीए.
खुशबु आणि संग्राम या सेलिब्रिटी कपलने फ्युजन फोडणीचा भात बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तर हा फ्युजन फोडणीचा भात नेमका आहे तरी काय हे तुम्हाला कळलं तर तुम्हीही चक्रावून जाल. खुशबुने आधी फोडणीचा भात बनवून घेतला. आणि त्यानंतर दोघांनी मॅगी बनवली. ही मॅगी चक्क त्यांनी फोडणीच्या भातात मिक्क केली आणि ते असा तयार झाला फ्युजन फोडणीचा भात.
दोघांनी बनवलेला हा फ्युजन फोडणीचा भात काही नेटकऱ्यांना आवडला पण काहींनी मात्र या कपलला चांगलंच ट्रोल केलंय.'भातासोबत मॅगी कोण खातं', 'असं का केलंत तुम्ही' अशा कमेंट्स केल्या आहेत.
संग्राम साळवी 'देवयानी' मालिकेतून घराघरात पोहोचला आहे. त्याने नुकतेच ओटीटी माध्यमातही पदार्पण केले. प्लॅनेट मराठीच्या 'कंपास' सिरीजमध्ये तो झळकला. तसंच तो लवकरच करण जोहरच्या 'ए वतन मेरे वतन' या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये सारा अली खान मुख्य भूमिकेत आहे. तर दुसरीकडे खुशबु क्राईम पेट्रोल मध्ये अनेकदा अभिनय करताना दिसते.