केवळ 'कॉपी अँड पेस्ट' ची मिळाली शिक्षा.. वर्षभरापूर्वी घडलेला प्रकार केतकी चितळेने पुन्हा सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 15:48 IST2023-05-15T15:47:20+5:302023-05-15T15:48:15+5:30
केतकी चितळेची महिला आयोगावरही टीका

केवळ 'कॉपी अँड पेस्ट' ची मिळाली शिक्षा.. वर्षभरापूर्वी घडलेला प्रकार केतकी चितळेने पुन्हा सांगितला
मराठी अभिनेत्री केतकी चितळेला गेल्या वर्षी ए फेसबुक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अटक झाली होती. नंतर काही महिन्यांनी तिची सुटका झाली. १४ मे २०२२ रोजी तिला कळंबोली पोलिसांनीअटक केली होती. त्या दिवसाला एक वर्ष पूर्ण झालं. म्हणून केतकीने वर्षभरापूर्वीच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे. तिच्या युट्यूब चॅनलवरुन तिने घडलेला घटनाक्रम सांगितला आहे.
गेल्या वर्षी अभिनेत्री केतकी चितळेने कोणा दुसऱ्याची फेसबुक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह शब्द होते. केतकी म्हणाली, " केवळ 'कॉपी अँड पेस्ट' करण्याची शिक्षा मला मिळाली. अरेस्ट वॉरंट नसताना अटक करण्यात आली. प्रोटोकॉल न पाळताच मला तुरुंगात डांबले.
आपण सुरक्षित नाही
पोलिसांच्या सुरक्षेत असून जर कोणी राजकीय कार्यकर्ता हल्ला करत असेल तर आपण कोणत्या जमान्यात राहतोय हाच प्रश्न पडतो. यावरुन गेल्या वर्षीची आपली राजकीय परिस्थिती काय होती हे समजून घ्या. सामान्य माणूस महाराष्ट्रात सुरक्षित नाही, पोलिस कस्टडीमध्येही आपण सुरक्षित नाही हे स्पष्ट दिसतं. युट्यूब व्हिडिओ वरुन तुम्ही बघू शकता माझा कसा विनयभंग होत आहे. कोणी साडी ओढतंय कोणी ब्लाऊज, माझ्या शरिराचे कोणते कोणते भाग कसेकसे दाबले गेले ते सगळं दिसेल.
महिला आयोग म्हणजे कठपुतलीयॉं ?
या घटनेला १ वर्ष झालं. महिला आयोग काय करतंय. जेव्हा मी महिला आयोगाकडे गेले तेव्हा त्यांनी मला स्थानिक कार्यालयात पाठवले. तर त्या अधिकारी मला उलटच सांगतात की ईमेलमध्ये जशी उत्तरं मिळाली की चौकशी होईल तीच उत्तरं आम्हालाही मिळणार आहेत.
केतकीने तिच्या युट्यूब चॅनलवर अर्ध्या तासाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये तिने हिंदीत गेल्या वर्षी घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला आहे. तसंच 'सरकार कोणाचंही असो, सिस्टीम तर आपलीच आहे?' असं कॅप्शन व्हिडिओला दिलं आहे.