कावेरी होणार लवकरच आई; गुडन्यूज ऐकल्यावर काय असेल राजची रिॲक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 17:18 IST2024-02-15T17:17:38+5:302024-02-15T17:18:07+5:30
Tv serial: मोहित्यांच्या घरी लवकरच होणार आहे चिमुकल्या पावलांचं आगमन

कावेरी होणार लवकरच आई; गुडन्यूज ऐकल्यावर काय असेल राजची रिॲक्शन
कलर्स मराठीवर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'भाग्य दिले तू मला'. उत्तम कथानक असल्यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यामुळेच आजही तिचा प्रेक्षकवर्ग कायम आहे. आतापर्यंत या मालिकेत राज आणि कावेरी यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. मात्र, लवकरच त्यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
अनेक दु:ख, संकटांचा सामना केलेल्या राज आणि कावेरी यांचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी त्याच्या आयुष्यात एका चिमुकल्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. कावेरी लवकरच आई होणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये राज-कावेरी, आई-बाबा होणार असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, कावेरीला मातृत्वाची चाहूल लागल्यानंतर ती राजला सगळ्यात प्रथम ही गोड बातमी देण्याचा प्रयत्न करते. मात्र, राजचा फोन बंद असतो. तो फोन बंद करुन किमयाकडे देतो. त्यामुळे राजला ही गोड बातमी कळेल का? किमया त्याला ही बातमी कळू देईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.