KBC 16 : 1 कोटीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 14:07 IST2024-12-16T14:07:28+5:302024-12-16T14:07:41+5:30

इंटरनेटवर एक कोटीच्या या प्रश्नाची चर्चा होत आहे. तो कोणता प्रश्न होता आणि त्याचे उत्तर काय होते? ते पाहूया. 

Kaun Banega Crorepati 16 Contestant Pankajini Dash Correctly Guesses Rs 1 Crore Question Related To Elizabeth And Kamal Haasan After Quitting The Game | KBC 16 : 1 कोटीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का?

KBC 16 : 1 कोटीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का?

Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती' चा 16 वा सिझन सुरू आहे. या शोचे सुत्रसंचालन अमिताभ बच्चन करत आहेत. या शोमध्ये अमिताभ बच्चन हे स्पर्धकांना प्रश्न विचारतात. ज्ञानाच्या बळावर लोक कसे लखपती आणि करोडपती होतात हे या शोच्या माध्यमातून आपण पाहत असतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये एक कोटीच्या प्रश्नापर्यंत स्पर्धक पंकजिनी दाश पोहचल्या. मात्र, त्यांना एक कोटी रुपयांसाठीच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्यांनी ५० लाखांचे बक्षीस घेऊन खेळ तिथेच सोडला. आता इंटरनेटवर एक कोटीच्या या प्रश्नाची चर्चा होत आहे. तो कोणता प्रश्न होता आणि त्याचे उत्तर काय होते? ते पाहूया. 


हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धक पंकजिनी दाश यांना अमिताभ बच्चन यांनी क्वीन एलिझाबेथ आणि कमल हासन यांच्याशी संबंधित प्रश्न विचारला होता. प्रश्न असा होता की, '1997 मध्ये, भारत भेटीदरम्यान महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी कमल हसनच्या कोणत्या चित्रपटाच्या सेटला भेट दिली होती, जो अद्याप अपूर्ण आहे?  हा प्रश्न 1 कोटीसाठी विचारण्यात आला.  प्रश्नासाठी त्याला A. चमयम  B. मरुधानायगम C. मार्कंडेयन D. मर्मयोगी, असे पर्याय देण्यात आले. परंतु योग्य उत्तर येत नस्लयाने त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला आणि 25 लाख रुपये जिंकले. 


हे प्रश्नाचे योग्य उत्तर 

 या प्रश्नाचे अचूक उत्तर 'मरुधानायगम" आहे.  पंकजिनी दाश यांनी 1 कोटींसाठी असलेल्या प्रश्नावर खूप विचार केला. ते दोन ऑप्शन्समध्ये गोंधळल्या होत्या. त्यांच्या मते मरुधनयागम आणि मार्कंडेयन यांच्यापैकी एक उत्तर आहे. पण,  पण त्या त्यांच्या या उत्तराला घेऊन ठाम नव्हत्या आणि त्यांनी तिथेच गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमल हसनचा चित्रपट 'मरुधनायागम' 6 ऑक्टोबर 1997 रोजी MGR फिल्म सिटीमध्ये लॉन्च झाला होता. वास्तविक जीवनातील स्वातंत्र्यसैनिक 'मरुधनायागम' यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाच्या लॉन्चिंगला राणी एलिझाबेथ द्वितीय यांना पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी कमल हसनची पत्नी आणि अभिनेत्री सारिकाने राणीचे भव्य स्वागत केले होते. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या एका सीनमध्ये एलिझाबेथ II देखील  होत्या. त्या सीनसाठी अभिनेत्याने 1.5 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, बजेटअभावी हा चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही.

Web Title: Kaun Banega Crorepati 16 Contestant Pankajini Dash Correctly Guesses Rs 1 Crore Question Related To Elizabeth And Kamal Haasan After Quitting The Game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.