'आमच्या घरची परिस्थिती आम्हालाच ठाऊक, ती फटकन्...'; जया बच्चन यांच्याबद्दल बिग बींची मिष्किल टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 13:06 IST2023-11-17T13:05:42+5:302023-11-17T13:06:17+5:30
Amitabh bachchan: 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर बिग बींनी त्यांच्या घरची परिस्थिती नेमकी कशी असते हे सांगितलं आहे.

'आमच्या घरची परिस्थिती आम्हालाच ठाऊक, ती फटकन्...'; जया बच्चन यांच्याबद्दल बिग बींची मिष्किल टिप्पणी
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या मंचावर अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) कायम त्यांच्या प्रोफेशनल वा पर्सनल आयुष्यातील काही किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करत असतात. सध्या या कार्यक्रमाचं 15 वं पर्व सुरु असून या पर्वातही बिग बींनी त्यांच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. यात सध्या खासकरुन त्यांनी अभिनेत्री आणि त्यांची पत्नी जया बच्चन (jaya bachchan) यांच्याविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत येत आहे.
सध्या सोशल मीडियावर 'कौन बनेगा करोडपती'चा एक प्रोमो व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बिग बींनी त्यांच्या घरचं वातावरण कसं असतं हे सांगितलं आहे. सोबतच जया बच्चन यांच्यासोबत ते कधीच पंगा घेत नाही म्हणजेच कधीच वाद घालत नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे.
अलिकडेच या कार्यक्रमात एका स्पर्धकाने ८० हजाराच्या प्रश्नावर हा गेम सोडायचा निर्णय घेतला. या स्पर्धकाला दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजूपत (sushant singh rajput) याच्या 'ब्योमकेश बख्शी' या सिनेमातील प्रश्न विचारण्यात आला होता. या ८० हजारांसाठी विचारल्या गेलेल्या या प्रश्नचं उत्तरं स्पर्धकाला देता न आल्यामुळे त्यांनी हा गेम थांबवायचा निर्णय घेतला. त्यावर, 'आजच्या काळात अशा कोणत्या स्पर्धकाला तुम्ही पाहिलंय का जो गेम सोडून जातोय?' असा प्रश्न अमिताभ यांनी प्रेक्षकांना विचारला. त्यावर, 'मला असं वाटतं तुमच्यासमोर बसणारा प्रत्येक व्यक्ती करोडपतीच असतो', असं स्पर्धक अलोलिका म्हणते. विशेष म्हणजे तिच्या या वाक्यावर बिग बी त्यांच्या घरातील एक मजेदार गोष्ट सांगतात. याचवेळी ते 'मी कधीच जयासोबत पंगा घेत नाही', असंही त्यांनी सांगितलं.
"मी तुम्हाला माझ्या वैयक्तिक अनुभवावरुन एक गोष्ट सांगतो. बंगाली लोकांसोबत कधीच वादा घालायचा नाही. आमच्या घरची परिस्थिती आम्हाला माहित. तुम्ही कधी बंगाली लोकांसोबत वाद घालूच शकत नाही. त्यांच्याकडे झटकन कोणतं ना कोणतं उत्तर तयारच असतं. वरुन तुमच्यावरच एखादी गोष्ट लादून देतील. आज असंच काहीसं माझ्याबाबतीत झालंय", असं अमिताभ बच्चन म्हणतात. विशेष म्हणजे त्यांच्या बोलण्याचा रोख हा पूर्णपणे जया बच्चन यांच्याकडे होता. कारण, जया बच्चन या बंगाली आहेत.