'कसौटी जिंदगी की'मधील ही चिमुकली आठवते का? इंडस्ट्रीपासून दूर आता काय करते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 11:51 IST2026-03-07T11:50:12+5:302026-03-07T11:51:10+5:30

Shreya sharma: रुपेरी पडदा गाजवणारी श्रेया आता कलाविश्वापासून दूर झाली आहे. इतकंच नाही तर ती एका वेगळ्या क्षेत्रात तिचं करिअर करत आहे.

kasautii-zindagi-kay-prerna-daughter-sneha-aka-shreya-sharma-look-changed-after-24-years | 'कसौटी जिंदगी की'मधील ही चिमुकली आठवते का? इंडस्ट्रीपासून दूर आता काय करते

'कसौटी जिंदगी की'मधील ही चिमुकली आठवते का? इंडस्ट्रीपासून दूर आता काय करते

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'कसौटी जिंदगी की'. ही मालिका संपून आज बरीच वर्ष झाले. परंतु, त्याची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. या मालिकेतील कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात. यामध्येच मालिकेतील चिमुकली सध्या काय करते असा प्रश्न अनेकांना पडतो.

बालकलाकार श्रिया शर्माने ''कसौटी जिंदगी की'' या मालिकेत  अनुराग आणि प्रेरणा यांच्या लेकीची स्नेहाची भूमिका साकारली होती. श्रेयाची ही भूमिका त्यावेळी बरीच गाजली. या मालिकेनंतर ती अनेक सिनेमा, मालिकां आणि शो मध्ये झळकली. मात्र, त्यानंतर ती इंडस्ट्रीतून दिसेनाशी झाली.

रुपेरी पडदा गाजवणारी श्रेया आता कलाविश्वापासून दूर झाली आहे. इतकंच नाही तर ती एका वेगळ्या क्षेत्रात तिचं करिअर करत आहे. श्रेया आता २७ वर्षांची असून एक यशस्वी वकील आणि लेखिका आहे. तसंच सोशल मीडियावरही ती सक्रीय आहे. त्यामुळे तिच्या करिअरचे वा वैयक्तिक आयुष्याचे अपडेट ती चाहत्यांना देत असते.


दरम्यान, २००७ मध्ये रिलीज झालेल्या लागा चुनरी में दाग या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या श्रेयाने 'थोड़ा प्यार थोडा मॅजिक', 'चिल्लर पार्टी' या सिनेमातही काम केलं. श्रेयाला बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे.

Web Title : 'कसौटी जिंदगी की' की वो छोटी बच्ची याद है? अब ये काम करती है

Web Summary : 'कसौटी जिंदगी की' में स्नेहा की भूमिका निभाने वाली श्रिया शर्मा अब वकील और लेखिका हैं। 27 वर्षीय, जिन्होंने एक बाल कलाकार के रूप में शुरुआत की और एक राष्ट्रीय पुरस्कार जीता, सोशल मीडिया पर सक्रिय हैं, और मनोरंजन उद्योग से दूर अपने जीवन और करियर के बारे में अपडेट साझा करती हैं।

Web Title : Remember 'Kasautii Zindagii Kay' child actor? Here's what she does now

Web Summary : Shriya Sharma, known for playing Sneha in 'Kasautii Zindagii Kay,' is now a lawyer and writer. The 27-year-old, who started as a child actor and won a national award, is active on social media, sharing updates about her life and career away from the entertainment industry.