कार्तिकी गायकवाडने 'नीज बाळा' अंगाई रिलीज करत दाखवली लेकाची झलक, दिसतो खूपच गोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 11:38 IST2025-04-14T11:37:58+5:302025-04-14T11:38:18+5:30
कार्तिकीने लेकाचं नाव काय ठेवलंय माहितीये का?

कार्तिकी गायकवाडने 'नीज बाळा' अंगाई रिलीज करत दाखवली लेकाची झलक, दिसतो खूपच गोड
'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्स ची विजेती गायिका कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) गेव्यावर्षी आई झाली. तिने गोंडस मुलाला जन्म दिला. यानंतर कार्तिकी अनेक कार्यक्रमांमध्ये दिसली. मात्र तिने आतापर्यंत लेकाचा चेहरा दाखवला नव्हता. आता तिने पहिल्यांदाच लेकाची झलक दाखवली आहे. तसंच त्याचं नावही रिव्हील केलं आहे.
कार्तिकी गायकवाडने तिच्या युट्यूब चॅनलवर 'नीज बाळा' ही अंगाई रिलीज केली आहे. यामध्ये तिने लेकाचं नाव उघड केलं आहे. तसंच तिने त्याचा चेहराही दाखवला आहे. रिशांक (Rishank) असं तिने लेकाचं नाव ठेवलं आहे. रिशांक कार्तिकी रोनित पिसे असं स्क्रीनवर लिहून येतं. नंतर कार्तिकी नीज बाळा ही अंगाई गायला सुरुवात करते. तेव्हाच रोनित लेकाला घेऊन येतो. रिशांक ११ महिन्यांचा असून नुकताच चालायला लागला आहे याचीही झलक दिसते. व्हिडिओच्या शेवटी रिशांक कार्तिकीच्या मांडीवर शांत निजलेला दिसतो. आई, वडील आणि लेकाचा हा क्युट व्हिडिओ भावुक करणारा आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
कार्तिकीने स्वत:च गाणं लिहिलं आहे. तसंच याला संगीतही दिलं आहे. कार्तिकीने गेल्या वर्षी १४ मे रोजी रिशांकला जन्म दिला. पुढच्या महिन्यात रिशांक १ वर्षाचा होणार आहे. त्याआधी कार्तिकीने त्याचा चेहरा चाहत्यांना दाखवला.
कार्तिकी आणि रोनित पिसे २०२० साली लग्नबंधनात अडकले. चार वर्षांनी ते आईबाबा झाले. कार्तिकी लेकाच्या जन्मानंतर लगेच कामावरही आली. अनेक ठिकाणी तिच्या गाण्याचे कार्यक्रम होतात. आजही गावागावात तिच्या आवाडाची जादू आहे.