'इथेच टाका तंबू' मालिकेत अखेर कपिलने कोणाला केले प्रपोज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 13:26 IST2016-12-06T13:19:19+5:302016-12-06T13:26:04+5:30
'इथेच टाका तंबू' मालिकेत प्रेमाचे फुटलेले अंकुर आता बहरतांना दिसणार आहेत.कारण प्रेम कधी कोणावर आणि कसं होईल याची कधीच ...

'इथेच टाका तंबू' मालिकेत अखेर कपिलने कोणाला केले प्रपोज?
' ;इथेच टाका तंबू' मालिकेत प्रेमाचे फुटलेले अंकुर आता बहरतांना दिसणार आहेत.कारण प्रेम कधी कोणावर आणि कसं होईल याची कधीच शाश्वती नसते . पण ते जेव्हा होत तेव्हा त्या व्यक्तीशिवाय इतर काहीही सुचत नाही . अनेकदा तुम्ही तुमच्या एखाद्या आवडत्या व्यक्तीला भेटता.तेव्हा त्याचा सहवास तुम्हाला हवाहवासा वाटतो. पण तुमच्या मनात ही भावना का येत असते याचे उत्तर अनेकांना मिळत नाही.असंच काहीस कपिल आणि गौरीचं झाले आहे. कारण आता सगळंच एकमेकांना उमगलंय.गौरीला कपिल आवडत होताच पण कपिलची चलबिचल होत होती. आणि शेवटी जेव्हा सौरभ त्या दोघांमध्ये आला तेव्हा मात्र कपिलला तो गौरीवर किती मनापासून प्रेम करतो हे उमगून आलं. पण आता त्याला हे कळत नाही आहे कि गौरी त्याच्यावर प्रेम करते आहे कि सौरभ वर त्यामुळे आता या पठ्ठयाला गौरीला प्रपोझ करायचंय आणि त्यासाठी रामाश्रय मध्ये संपूर्ण तयारी केलीय. हिंदी सिनेमांपेक्षाही जास्त रोमँटिक असं रामाश्रय कपिल ने सजवलंय. लाल रंगाचे हार्टशेप असलेले फुगे, कॅण्डल लाईट्स, सॉफ्ट म्युझिक, लाल गडद रंगाचे पडद्याने हे सजवण्यात आले आहे.खासकरून गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेलं रामाश्रय आणि साथीला रामाश्रयची सर्व मंडळी सेलिब्रेसनच्या मुडमध्ये आहेत कारण निमित्त आहे गौरीचा वाढदिवसाचे.वाढदिवसाच्या दिवशीच कपिल मधुराला प्रपोझ करतोय. गुढग्यावर बसून, गौरीच्या डोळ्यात डोळे घालून, प्रेमाने तिचा हात हातात घेऊन तो तिला प्रपोज करतोय. आणि विशेष म्हणजे सगळ्याचे लक्ष आहे गौरीच्या आता नेमके याला काय उत्तर देणार याकडे. मालिकेतील हेच खास आणि रोमँटीक क्षण लवकरच या मालिकेतून उलगडण्यात येणार आहे.
![]()