कांची सिंहला करायची ही भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 06:42 AM2017-09-06T06:42:25+5:302017-09-06T12:12:25+5:30

‘ये रिश्ता क्या कहलाता है’मालिकेत गायू या भूमिकेमुळे घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री कांची सिंहने ही मालिका सोडल्यानंतर चॅलेजिंग भूमिका ...

Kanchi laugh to play a role? | कांची सिंहला करायची ही भूमिका?

कांची सिंहला करायची ही भूमिका?

googlenewsNext
े रिश्ता क्या कहलाता है’मालिकेत गायू या भूमिकेमुळे घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री कांची सिंहने ही मालिका सोडल्यानंतर चॅलेजिंग भूमिका करायचा निर्धार केला आहे.एक कलाकार म्हणून विविधांगी भूमिकाच कलाकाराला समृध्द बनवू शकतो असे कांचीचे मत आहे.त्यानुसार भूमिका मिळाल्या तरच छोट्या पडद्यावर काम करण्याचा विचार करणार असल्याचे तिने म्हटले आहे. सध्या कांची 'बिग बॉसच्या 11'व्या सिझनमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत.मात्र यावर कांचीने बोलणे टाळले आहे. तसेच कांचीने ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेविषयी सांगितले, हिंदी मालिकेत ही मालिका खूप लोकप्रिय आहे. प्रत्येक कॅरेक्टरला रसिकांनी भरभरून प्रेम दिले. त्यात माझी गायू ही भूमिकाही रसिकांना आवडली चांगला अनुभव मला या मालिकेतून मिळाला.मात्र कुठे ना कुठे एकच एक भूमिका करताना कुठेतरी  थांबणेही गरजेचे असते. जो पर्यंत आपण त्याच त्या गोष्टी करत राहणार तोपर्यंत दुस-या संधी आपल्याला मिळणार नाही हाच मी विचार केला आणि मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत मला ऑफर होणा-या भूमिकेतून माझ्या अभिनयाचा ठसा उमटवणारी भूमिका मिळत नाही तोपर्यत मी छोट्या पडद्यावर झळकणार नसल्याचे तिने म्हटले आहे. ‘ये रिश्ता  क्या कहलाता है' ही मालिका एक सामूहिक कलाकाराची कथा होती. मात्र आता  भविष्यात मला फक्त आणि फक्त माझ्यावर आधारित असणारी मालिका करायची आहे. मालिकेत मला आता मुख्य भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचे कांचीने सांगितले.ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेला कांचीच्या आधी करण मेहरा आणि रोहन मेहराने गुड बाय केले त्यानंतर मालिकेतली सगळ्यात लोकप्रिय असलेली अक्षरा ही भूमिका करणारी हिना खानने मालिका सोडली आणि त्यानंतर आता कांती सिंहने मालिकेला गुड बाय म्हटले आहे.आगामी काळाता आणखी कोणता कलाकार मालिकेतून एक्झिट करणार हे तर वेळच ठरवेन.सध्या तरी मालिका फक्त नायरा आणि कार्तिक यांच्या प्रेमकहानीवरच जास्त फोकस करण्यात आले आहे.ही गोष्टही ब-याच कलाकारांना खटकली त्यामुळे त्यांनी मालिका सोडल्याच्या चर्चा आहेत.

Also Read:'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील मोहसिन खान आणि शिवांगी जोशीने अखेर दिली प्रेमाची कबुली

Web Title: Kanchi laugh to play a role?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.