कुणीतरी येणार गं! 'कमळी' मालिकेतील 'ही' अभिनेत्री होणार आई, डोहाळजेवणाचा फोटो आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:58 IST2025-12-17T13:54:44+5:302025-12-17T13:58:24+5:30
'ही' मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई, डोहाळ जेवणाचे फोटो व्हायरल

कुणीतरी येणार गं! 'कमळी' मालिकेतील 'ही' अभिनेत्री होणार आई, डोहाळजेवणाचा फोटो आला समोर
Kamali Fame Actress Sai Kalyankar Become Mother Soon: मराठी मालिकांचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या मालिकांमध्ये काम करणारे कलाकार अगदी अल्पावधीतच घराघरात लोकप्रिय होतात. छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या अशाच एका अभिनेत्रीने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. या अभिनेत्रीचं नाव म्हणजे सई कल्याणकर. मराठी मालिका विश्वातील ही लोकप्रिय अभिनेत्री लवकरच आई होणार आहे.

'दख्खनचा राजा ज्योतिबा', 'ठिपक्यांची रांगोळी या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई कल्याणकरच्या घरी लवकरच चिमुकल्या सदस्याचं आगमन होणार आहे. सध्या सई झी मराठीच्या कमळी मालिकेत काम करताना दिसतेय. या मालिकेत ती राधिका नावाचं पात्र साकरते आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सई कल्याणकरचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री डोहाळजेवणासाठी तयार झाल्याची पाहायला मिळतेय. सईने अद्याप याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. परंतु इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीच्या 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील सहकलाकार अभिनेत्री नम्रता प्रधान आणि तन्वी बर्वे हिने तिच्या डोहाळजेवणाचा खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
अभिनेत्री सई कल्याणकरच्या दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतील तिच्या चोपडाई या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली. आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये सईने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.सईने २०२१ मध्ये शिवराम चव्हाण यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या चार वर्षानंतर अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार आहे.