१४ वर्ष संसार, ३ मुलांचे पालक! घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान जय भानुशालीने शेअर केला व्हिडीओ, पत्नी कमेंट करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:25 IST2025-10-28T12:19:05+5:302025-10-28T12:25:54+5:30
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान जय भानुशालीने शेअर केला व्हिडीओ, पत्नी कमेंट करत म्हणाली...

१४ वर्ष संसार, ३ मुलांचे पालक! घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान जय भानुशालीने शेअर केला व्हिडीओ, पत्नी कमेंट करत म्हणाली...
Jay Bhanushali : छोट्या पडद्यावरील मालिका आणि रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे जय भानुशाली. मागील बऱ्याच दिवसांपासून जय त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दरम्यान, सध्या सगळीकडे जय त्याची पत्नी माही विजपासून विभक्त होणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. काही दिवसांपासून या जोडीच्या नात्यात दुरावा आल्याचा म्हटलं जात आहे. अद्याप दोघांनीही घटस्फोटवर अधिकृतरित्या भाष्य केलेलं नाही. मात्र, या चर्चांदरम्यान, अभिनेत्याने सोशल मीडियावर त्याची लेक तारासोबत एक सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
जय आणि माही २०११ मध्ये लग्नबंधनात अडकले होते.गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट वगैरे टाकलेली नाही. त्यामुळे या जोडप्यामध्ये काही बिनसलं असल्याचे तर्कवितर्क लावण्यात येत आहे. अशातच जय भानुशालीने लेकीसोबतचा व्हिडीओ पोस्ट करत अफवा पसरवणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. या व्हिडीओमध्ये जय-माहीची लेक डान्स करताना दिसते आहे. व्हिडिओमध्ये,तारा ‘There’s squirrels in my pants’ या व्हायरल गाण्यावर नाचताना दिसत आहे, तर जय मजेदार पद्धतीने लिपसिंक करतो आहे. "जेव्हा वडील आपल्या मुलासोबत एकटे असतात तेव्हा असेच घडते." असं मजेशीर कॅप्शन जयने या व्हिडीओला दिलं आहे.
दरम्यान, यावर सर्वात माहीने विजने लक्षवेधी कमेंट केली आहे. आपल्या लेकीचा डान्स पाहून अभिनेत्रीने म्हटलंय,"तारा सर्वात गोंडस आहे." यावर जयने उत्तर दिलं, "खरं आहे." यावरून चाहते आता त्यांच्या घटस्फोटाबद्दलच्या चर्चा या निव्वळ अफवा असल्याचं म्हणत आहेत.
मिडिया रिपोर्टनुसार,जय आणि माहिने २०२५ मध्येच घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. शिवाय काही काळापासून ते दोघे वेगळे राहत असल्याचंही सांगण्यात येत आहे.जय आणि माही यांचे लग्न २०११ मध्ये झालं. त्यांना तारा ही मुलगी आहे. तर त्यांनी दोन मुलांना दत्तक घेतलं आहे. त्यामुळे आता या तीन मुलांचं काय होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.